पोस्ट्स

सलग दोन वर्षे वापरात नसलेली जीमेल अकाऊंट होणार बंद !

  जी मेल ही सर्वांत जास्त वापरली जाणारी ईमेल सेवा आहे. ईमेल वापरणाऱ्या प्रत्येकाचे साधारणपणे एक तरी जीमेल अकाउन्ट असतेच. परंतु अनेकवेळा वेगवेगळी जीमेल अकाउंट ओपन केली जातात. आणि ती नंतर वापरली जातातच असे नाही. अनेकवेळा. अकाउंट ओपन केले जाते व नंतर ते कधी एकदाही परत ओपन केले जात नाही. एखाद ई मेल आयडीचांगला मिळत असेल तर अकाउंट ओपन होते. परंतु परत वापरले जात नाही. अशा लोकांसाठी काल गूगलने महत्त्वाची घोषणा केली आहे. सलग दोन वर्षे जे अकाउंटला लॉगिन केले नसेल तर ते जीमेलचे अकाउंट. येत्या डिसेंबरपासून. डिलीट केले जाईल. जुनी अकाऊंट डिलीट करण्याचे काम. करण्यापूर्वी वापरकर्त्याला अनेक मॉर्निंग मेसेजेस पाठवले जातील. त्याने जो ई मेल आयडी ओपन केला आहे त्यावर आणि रिकव्हरी इमेल आयडी दिला असेल त्यावरही. गूगलचे म्हणणे असे आहे की सलग दोन वर्षे न वापरण्यात येणारे अकाउंट धोकादायक ठरू शकतात. ते हॅक झाल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. दोन वर्षे सलग न ओपन केलेले अकाउंट वापरकर्त्याला गरजेचे नाही. असे मानून गूगल ते अकाउंट डिलीट करायला सुरुवात करणार आहे. पहिल्यांदा ज्यांनी अकाऊंट ओपन केले पण परत. कधीच लॉग इन क...

Gmailify करा !

  इ मेल हा आजही कार्यालयीन कामासाठी आणि काही प्रमाणात वैयक्तिक कामासाठी आवश्यक आहे. अनेक कंपन्यांनी मेलवरचा भर कमी करून संवादाची नवीन माध्यमे स्वीकारली असली तरी आजही इमेलचे महत्व कमी झालेले नाही. प्रत्येक कंपनी आपले विशिष्ट डोमेन नेम वापरून ही सेवा वापरते. उदा. *.*@timesgroup.com असे इमेल आयडी असतात. कार्यालयीन कामासाठी असे अंतर्गत इमेल आयडी असले तरी खासगी कामासाठी बऱ्याच वेळा जीमेल / आऊटलूक / हॉटमेल / याहू यांची सेवा वापरली जाते. एका वेळेस अनेक इमेल आयडी तयार केलेले असू शकतात. अशा वेळेस प्रत्येक इमेल आयडी वेगवेगळा ओपन करून पाहणे त्रासाचे ठरते. तुम्ही जीमेल वापरत असाल तर इतर सेवांचे (आऊटलूक / हॉटमेल / याहू ) इमेल आयडी इम्पोर्ट अथवा Gmailify करू शकता.   हे Gmailify   म्हणजे काय ? दुसऱ्या सेवेचा इमेल आयडी इम्पोर्ट करण्यासारखाच हा प्रकार आहे. परंतु इम्पोर्ट पेक्षा वेगळा आहे. समजा माझा *.*@याहू.कॉम हा इमेल आयडी आहे. तो Gmailify  केल्यास याहूच्या आयडीवर दिसणारे सगळे मेल मला जीमेलमध्येही दिसतील. याहू आयडी ओपन करून बघण्याची गरज नाही. मी जीमेलमधूनच याहू आयडी वापरून मेल ...

गूगल कीप हा चांगला पर्याय !

इमेज
  आ जकाल जीवन फार धावपळीचे झाले आहे. ऑनलाईन काम करण्याचे काही फायदे असले तरी तोटेही कमी नाहीत. कोविड काळामध्ये अनेकांना बारा-बारा तास काम करावे लागले. ९ ते ५ अथवा १० ते ६ अशा निश्चित वेळा कधीच इतिहासजमा झाल्या. कार्यालयीन कामाबरोबरच प्रत्येकाला खासगी आयुष्य असते. कार्यालयीन काम आणि खासगी कामे याचा मेल घालताना अनेकांच्या नाकीनऊ येतात. अशा वेळेस वेळेचे नियोजन, करायच्या असलेल्या कामाचे दिवसानुरूप नियोजन या गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यासाठी गूगल कीप या जीमेल वापरकर्त्यांना फुकटात उपलब्ध असणाऱ्या अँपचा वापर करायलाच हवा. डेस्कटॉप अथवा लॅपटॉपवर जीमेल उघडले असेल तर उजव्या बाजूला कॅलेंडर, कीप, टास्क आणि कॉन्टॅक्टस याची अँप दिसतील. त्यातील कीप ओपन करा. ओपन केल्यावर असे दिसेल. मग खाली उजव्या बाजूला चौकोनात टिकमार्क असलेले जे चिन्ह आहे त्यावर क्लिक करा. हे चिन्ह चेकलिस्ट तयार करण्याचे आहे. तुम्हाला आज अथवा आठवडाभरात कायकाय काम करायची आहेत त्याची यादी तयार करा. काही वेळेस कार्यालयीन कामाच्या गडबडीत सगळी कामे एकदम आठवत नाहीत. जशी आठवतील तशी इथे लिस्टमध्ये टाकत जा. नोंदवलेले काम झाले की त्या कामा...

अवजड मेल कसे शोधाल?

इमेज
  ज गातील दीड अब्जा लोकांपेक्षाही अधिक लोक जीमेल वापरतात. या जीमेलमध्ये फक्त १५ जीबी साठवणक्षमता फुकटात मिळते. परंतु आज एवढे विडिओ अथवा फोटो शेअर केले जातात की हा १५ जीबी डेटा कधी संपतो ते कळत नाही. वर्षाला १३०० रुपये देण्याची तयारी असेल तर १०० जीबी डेटा मिळतो हे खरे असले तरी अनेक जण १५ जीबीमध्येच काम करणे पसंत करतात. अनेक वेळा मोठ्या आकाराच्या फाईल्स मेलमध्ये असतात किंवा गूगल ड्राईव्ह मध्ये असतात. त्या कमी केल्या तर अधिक मेल / विडिओ / फोटो राहू शकतात. आपल्या मेलमध्ये मोठ्या आकाराचे मेल कोणते हे शोधायचे म्हणजे झाले.   हे कसे शोधाल? जीमेल ओपन करा. वर Search  in Mail असे दिसेल तिथे larger :10MB असे टाईप करा. म्हणजे तुमच्ये मेलमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त एमबीचे किती मेल आहेत ते लगेच कळेल. त्यातले अगदी आवश्यक असतील तेच ठेवा. जितके जास्त मेल काढून टाकाल तेवढी स्पेस वाढेल.   दुसरा मार्ग म्हणजे Search  in Mail असे दिसेल तिथे उजव्या बाजूला असलेल्या चिन्हावर क्लिक करा. तिथे जास्त पर्याय मिळतात. समजा एखाद्या  व्यक्तीकडून आलेले मेलच शोधायचे असतील तर तसे शोधता येता...

प्लसची गंमत !

  अ नेक लोक इमेल सेवा वापरताना वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे इमेल आयडी तयार करतात. एक इमेल कार्यालयीन कामासाठी, एक कौटुंबिक कामासाठी आणि एखादा इतर कामासाठी. तुम्ही ज्या कार्यालयात काम करता त्यांच्या 'डोमेन नेम'चा आयडी वापरणे आवश्यक असते हे खरे, पण इतर कामांसाठी वेगवेगळे आयडी तयार करण्याची खरे म्हणजे काहीच गरज नसते. जीमेलने एक वेगळी सोय उपलब्ध करून दिली आहे. समजा तुमचा आयडी abcd@gmail.com आहे. @ चिन्हाच्या आधी असलेल्या अक्षरांच्या पुढे + चे चिन्ह वापरून वेगळा आयडी तयार करू शकता. उदा. abcd+News@gmail.com, abcd+family@gmail.com, abcd+personal@gmail.com असे आयडी तयार होऊ शकतात. या इमेलवर पाठवलेले सगळे मेल abcd@gmail.com याच इमेलच्या इनबॉक्समध्ये येतील. वेगवेगळे इनबॉक्स ओपन करण्याची गरज नाही.   तुम्ही तयार केलेल्या इमेल आयडीचे मेल एकाच इनबॉक्समध्ये येत असल्याने इथे फिल्टरचा वापर करा. किंवा लेबलचा वापर करा. म्हणजे abcd+News@gmail.com या इमेल आयडीसाठी News लेबल करू शकता, तसेच abcd+family@gmail.com साठी Family लेबल होऊ शकते वगैरे. एकच आयडीमध्ये सगळे मेल मिळावा, त्यांचे व्यवस्थापन जास्...

अनेक मेल पाठवा एकाच मेलमध्ये !

इमेज
 आपला जीमेलचा इनबॉक्स भरत आला की 'वजनदार' मेल delete करणे अथवा फॉरवर्ड करणे हा एक मार्ग असतोच. वजनदार मेल कसे शोधायचे ते मी आधी सांगितले आहेच. (https://ashokpanvalkar.com/nb-110622/) हे वजनदार मेल अथवा अन्य महत्वाचे मेल एकेक करून फॉरवर्ड करत बसण्यात वेळ फार जातो. समजा तुम्हाला जीमेलमधले दहा मेल फॉरवर्ड करायचे आहेत. दहा वेळा मेल फॉरवर्ड करायची गरज नाही. जे मेल पाठवायचे आहेत ते सिलेक्ट करा (उघडू नका). उभ्या तीन ठिपक्यांच्या दांडीवर क्लिक करा. त्यात तळाला Forward As Attachment असा पर्याय दिसेल तो सिलेक्ट करा. मेल कोणाला पाठवायचे आहेत त्याचा पत्ता टाका आणि पाठवून द्या. एकाच मेलमध्ये हे दहा मेल त्याला मिळतील. त्याला जेव्हा हे मेल पाहायचे असतील तेव्हा त्याने त्या मेलच्या attachment वर क्लिक केले की तो मेल डेस्कटॉपवर Download होईल. मग त्यावर क्लिक केले की ओपन होईल. ही सोय आणखी एका बाबतीत उपयोगी पडते. तुम्ही कार्यालयीन काम करताना समजा एका व्यक्तीशी मेलद्वारे बोलत आहात. म्हणजे तुमच्या मेलवर त्याचा रिप्लाय, परत तुमचा रिप्लाय वगैरे. त्याच विषयातले मेल तुम्ही आधी इतरांना पाठवले असतील तर ते...

Trash मधून डिलीट केलेले मेल मिळवा परत

इमेज
  जीमेल, आऊटलूक आणि याहू या तीन मेलसेवांपैकी जीमेल सर्वात जास्त लोकप्रिय आहे. कार्यालयीन कामांसाठी अथवा वैयक्तिक कामासाठीही या जीमेलचा वापर होतो. ज्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे भरपूर मेल येतात, त्यांना ते रोज बघून त्यावर काम करणे शक्य असतेच असे नाही. मग वेळ असेल तेव्हा मेल बघायचे, delete करायचे अथवा गरजेप्रमाणे कृती करायची असे बरेच लोक करतात. या गडबडीत एखादा महत्वाचा मेल चुकून delete होऊ शकतो. ते वेळीच लक्षात आले तर Trash किंवा Bin फोल्डरमध्ये जाऊन आपण तो मेल परत मिळवू शकतो. (जे मेल हवे असतील ते सिलेक्ट करून Restore to Inbox केले की झाले.) पण Trash मधूनही delete झाले असले तर ? म्हणजे आपण Delete forever वर क्लिक केले असले तर ? मेल Trash मधूनही Delete केले असले तर ते परत मिळणार नाहीत, असे गूगल म्हणत असले तरी गूगलनेच आपल्याला एक संधी दिली आहे. अगदी एका मिनिटात हे मेल परत मिळवता येतात. कसे? तुम्ही वापरत असलेला ब्राउझर ओपन करा. तिथे Support.Google.com असे टाइप करा. मग पुढील पेज ओपन होईल. गूगलची वेगवेगळी अँप तिथे दिसतील. त्यातले जीमेल निवड. मग How Can We Help you असे लिहिले आहे तिथे Rec...

ChatGPT शिका, नोकरी मिळवा !

  स ध्या तंत्रज्ञान क्षेत्रात ChatGPT आणि AI हे शब्द इतके रुजले आहेत की याशिवाय इंटरनेट वापरणे हा गुन्हा आहे की काय असे वाटू लागले आहे. या ChatGPT मुळे नेमका काय परिणाम होईल, किती नोकऱ्या जातील अथवा निर्माण होतील हे अजून पुरेसे स्पष्ट झालेले नाही. ChatGPT हे नवीन आहे आणि अनेक सोयी आहेत हे खरे असले तरी सर्व काही या तंत्रज्ञानावर सोपवून मोकळे व्हायचे की स्वतः काही विचार करून लेखन करायचे याचाही निर्णय करावा लागेल. आयते मिळणारे सगळेच काही चांगले नसते हे लक्षात ठेवलेले बरे ! नोकरी मिळण्यासाठी प्रत्येक क्षेत्रानुसार, पदानुसार, गरजेनुसार शैक्षणिक वा कामाची पात्रता लागते. आधीच नवीन नोकरी मिळविण्यात अडचण आणि त्यात कंपन्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा पाहिल्या तर भविष्यकाळात नोकरी मिळवणे किती कठीण जाणार आहे, हे लक्षात येते. जपानमधल्या एका कंपनीचे उदाहरण लक्षात घ्या. टोकियो शहरात काम करणाऱ्या LayerX Inc. या कंपनीने जाहीर केले आहे की नोकरीसाठी उत्सुक असाल तर तुम्हाला ChatGPT टाळून चालणार नाही. ChatGPT संदर्भात परीक्षा द्यावी लागेल, OpenAI Inc., आणि Notion AI. यांनी तयार केलेल्या ChatGPT वर काम करता...

तंत्र-वृत्त

  ने टफ्लिक्सची सेवा सध्या १९० देशांमध्ये आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना कोणी तगडा प्रतिस्पर्धी नव्हता. पण आता ऍमेझॉन, HBO , डिस्ने यांसारखे प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सच्या दर्शकांमध्ये घट झाली होती, २०२३मध्ये पुन्हा प्रेक्षक आपल्याकडे येत आहेत असा दावा नेटफ्लिक्सने केला आहे. पासवर्ड शेअरिंग बंद केल्यावर यात किती फरक पडतो ते पाहावे लागेल. कदाचित यावरच मार्ग म्हणून नेटफ्लिक्सने ३० देशांमधील आपले वर्गणीचे दर कमी केले आहेत. त्यात ब्रिटन, अमेरिका, भारत हे मात्र नाहीत. मलेशिया , इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, क्रोएशिया, व्हेनेझुएला, इराण, केनिया हे देश आहेत. या साऱ्या देशांमध्ये नवीन ग्राहक मिळावेत आणि आधीपासून असलेले टिकून राहावेत हा हेतू आहे. ........................ माजमाध्यमांवर आपण एकदा पाठवलेला मेसेज दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध झाली तर? आयफोनवर जे लोक iMessage वापरतात त्यांना ही सुविधा उपलब्ध आहे. मेसेज पाठवल्यावर दुरुस्त करता येतो, आधीची चूक सुधारता येते. आता Whatsapp ही सुविधा सगळ्यांना उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे, एवढेच नव्हे तर Whatsapp चा Test...

'मायक्रोसॉफ्ट एज' शॉर्टकट

इमेज
 इंटरनेट एक्सप्लोरर ची जागा आता 'मायक्रोसॉफ्ट एज'ने घेतली आहे. एज हा गूगल क्रोमप्रमाणेच क्रोमियम प्रणालीवर आधारित आहे. अतिशय वेगवान आहे आणि क्रोममध्ये नसलेल्या काही सुविधा यात आहेत. हा browser वापरून पहाच. त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला हव्या त्या सुविधा enable करा. आणि दोन्हीतला फरक अनुभवा. हा 'मायक्रोसॉफ्ट एज' वापरण्यात अधिक सुविधा व्हावी म्हणून त्याचे काही शॉर्टकट इथे देत आहे. ते वापरून बघाच !    

'मायक्रोसॉफ्ट एज' शॉर्टकट

इमेज
 इंटरनेट एक्सप्लोरर ची जागा आता 'मायक्रोसॉफ्ट एज'ने घेतली आहे. एज हा गूगल क्रोमप्रमाणेच क्रोमियम प्रणालीवर आधारित आहे. अतिशय वेगवान आहे आणि क्रोममध्ये नसलेल्या काही सुविधा यात आहेत. हा browser वापरून पहाच. त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला हव्या त्या सुविधा enable करा. आणि दोन्हीतला फरक अनुभवा. हा 'मायक्रोसॉफ्ट एज' वापरण्यात अधिक सुविधा व्हावी म्हणून त्याचे काही शॉर्टकट इथे देत आहे. ते वापरून बघाच !    

फेसबुक रील्स आता ९० सेकंदांची !

 रील्स (Reels) हा इंस्टाग्राममधला वापरकर्त्यांचा  एक आवडता प्रकार आहे. स्वतः रील्स न टाकणारेही एकदा रील्स बघायला लागले की त्यांचा अर्धापाऊण तास कसा जातो ते काळातच नाही. हेच रील्स फेसबुकवर येऊन आठ महिने झाले. फेसबुकने आज त्याची कालमर्यादा वाढवली असून आता ६० सेकंदांऐवजी ९० सेकंदाचें रील्स टाकता येणार आहेत. याचबरोबर काही नवीन सोयीही फेसबुकने दिल्या आहेत.   या रील्सची निर्मिती करणाऱ्यांसाठी फेसबुकने 'Grooves' नावाने नवी सुविधा दिली आहे. रील्समधील मोशनसाठी जे गाणे ऍड केले असेल त्या गाण्याशी हे मोशन जुळवले जाईल. म्हणजेच गाण्यातील मोशन वेगळी आणि गाण्याचा ठेका वेगळा असे होणार नाही. visual beat टेकनॉलॉजि चा वापर करून हे केले जाईल. याशिवाय, Memories विभागातून आवडत्या आठवणींचे रेडिमेड रील्स शेअर करण्याची सोयही करण्यात आली आहे.   गेल्या सहा महिन्यांत फेसबुक व इंस्टाग्रामवर रील्स Re-share करण्याचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त वाढल्याचे 'मेटा' कंपनीला लक्षात आले. त्याचप्रमाणे रील्स बघण्याचे प्रमाणही दुपटीपेक्षा जास्त वेगाने वाढले आहे. त्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले.   'मेटा' कंपन...