प्लसची गंमत !

 नेक लोक इमेल सेवा वापरताना वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे इमेल आयडी तयार करतात. एक इमेल कार्यालयीन कामासाठी, एक कौटुंबिक कामासाठी आणि एखादा इतर कामासाठी. तुम्ही ज्या कार्यालयात काम करता त्यांच्या 'डोमेन नेम'चा आयडी वापरणे आवश्यक असते हे खरे, पण इतर कामांसाठी वेगवेगळे आयडी तयार करण्याची खरे म्हणजे काहीच गरज नसते. जीमेलने एक वेगळी सोय उपलब्ध करून दिली आहे.

समजा तुमचा आयडी abcd@gmail.com आहे. @ चिन्हाच्या आधी असलेल्या अक्षरांच्या पुढे + चे चिन्ह वापरून वेगळा आयडी तयार करू शकता. उदा. abcd+News@gmail.com, abcd+family@gmail.com, abcd+personal@gmail.com असे आयडी तयार होऊ शकतात. या इमेलवर पाठवलेले सगळे मेल abcd@gmail.com याच इमेलच्या इनबॉक्समध्ये येतील. वेगवेगळे इनबॉक्स ओपन करण्याची गरज नाही.

 

तुम्ही तयार केलेल्या इमेल आयडीचे मेल एकाच इनबॉक्समध्ये येत असल्याने इथे फिल्टरचा वापर करा. किंवा लेबलचा वापर करा. म्हणजे abcd+News@gmail.com या इमेल आयडीसाठी News लेबल करू शकता, तसेच abcd+family@gmail.com साठी Family लेबल होऊ शकते वगैरे. एकच आयडीमध्ये सगळे मेल मिळावा, त्यांचे व्यवस्थापन जास्त चांगले करता येते.

तुम्ही outlook.com वापरात असाल तर मात्र वेगळा आयडी करावा लागतो. ते कसे करायचे याबाबत https://ashokpanvalkar.com/st-080622/ इथे वाचू शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऐतिहासिक निकाल

आरोग्य अधिक जपायला हवे !

पहिल्या पानावरच्या लताबाई ...