पोस्ट्स

GMAIL लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सलग दोन वर्षे वापरात नसलेली जीमेल अकाऊंट होणार बंद !

  जी मेल ही सर्वांत जास्त वापरली जाणारी ईमेल सेवा आहे. ईमेल वापरणाऱ्या प्रत्येकाचे साधारणपणे एक तरी जीमेल अकाउन्ट असतेच. परंतु अनेकवेळा वेगवेगळी जीमेल अकाउंट ओपन केली जातात. आणि ती नंतर वापरली जातातच असे नाही. अनेकवेळा. अकाउंट ओपन केले जाते व नंतर ते कधी एकदाही परत ओपन केले जात नाही. एखाद ई मेल आयडीचांगला मिळत असेल तर अकाउंट ओपन होते. परंतु परत वापरले जात नाही. अशा लोकांसाठी काल गूगलने महत्त्वाची घोषणा केली आहे. सलग दोन वर्षे जे अकाउंटला लॉगिन केले नसेल तर ते जीमेलचे अकाउंट. येत्या डिसेंबरपासून. डिलीट केले जाईल. जुनी अकाऊंट डिलीट करण्याचे काम. करण्यापूर्वी वापरकर्त्याला अनेक मॉर्निंग मेसेजेस पाठवले जातील. त्याने जो ई मेल आयडी ओपन केला आहे त्यावर आणि रिकव्हरी इमेल आयडी दिला असेल त्यावरही. गूगलचे म्हणणे असे आहे की सलग दोन वर्षे न वापरण्यात येणारे अकाउंट धोकादायक ठरू शकतात. ते हॅक झाल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. दोन वर्षे सलग न ओपन केलेले अकाउंट वापरकर्त्याला गरजेचे नाही. असे मानून गूगल ते अकाउंट डिलीट करायला सुरुवात करणार आहे. पहिल्यांदा ज्यांनी अकाऊंट ओपन केले पण परत. कधीच लॉग इन क...

Gmailify करा !

  इ मेल हा आजही कार्यालयीन कामासाठी आणि काही प्रमाणात वैयक्तिक कामासाठी आवश्यक आहे. अनेक कंपन्यांनी मेलवरचा भर कमी करून संवादाची नवीन माध्यमे स्वीकारली असली तरी आजही इमेलचे महत्व कमी झालेले नाही. प्रत्येक कंपनी आपले विशिष्ट डोमेन नेम वापरून ही सेवा वापरते. उदा. *.*@timesgroup.com असे इमेल आयडी असतात. कार्यालयीन कामासाठी असे अंतर्गत इमेल आयडी असले तरी खासगी कामासाठी बऱ्याच वेळा जीमेल / आऊटलूक / हॉटमेल / याहू यांची सेवा वापरली जाते. एका वेळेस अनेक इमेल आयडी तयार केलेले असू शकतात. अशा वेळेस प्रत्येक इमेल आयडी वेगवेगळा ओपन करून पाहणे त्रासाचे ठरते. तुम्ही जीमेल वापरत असाल तर इतर सेवांचे (आऊटलूक / हॉटमेल / याहू ) इमेल आयडी इम्पोर्ट अथवा Gmailify करू शकता.   हे Gmailify   म्हणजे काय ? दुसऱ्या सेवेचा इमेल आयडी इम्पोर्ट करण्यासारखाच हा प्रकार आहे. परंतु इम्पोर्ट पेक्षा वेगळा आहे. समजा माझा *.*@याहू.कॉम हा इमेल आयडी आहे. तो Gmailify  केल्यास याहूच्या आयडीवर दिसणारे सगळे मेल मला जीमेलमध्येही दिसतील. याहू आयडी ओपन करून बघण्याची गरज नाही. मी जीमेलमधूनच याहू आयडी वापरून मेल ...

अवजड मेल कसे शोधाल?

इमेज
  ज गातील दीड अब्जा लोकांपेक्षाही अधिक लोक जीमेल वापरतात. या जीमेलमध्ये फक्त १५ जीबी साठवणक्षमता फुकटात मिळते. परंतु आज एवढे विडिओ अथवा फोटो शेअर केले जातात की हा १५ जीबी डेटा कधी संपतो ते कळत नाही. वर्षाला १३०० रुपये देण्याची तयारी असेल तर १०० जीबी डेटा मिळतो हे खरे असले तरी अनेक जण १५ जीबीमध्येच काम करणे पसंत करतात. अनेक वेळा मोठ्या आकाराच्या फाईल्स मेलमध्ये असतात किंवा गूगल ड्राईव्ह मध्ये असतात. त्या कमी केल्या तर अधिक मेल / विडिओ / फोटो राहू शकतात. आपल्या मेलमध्ये मोठ्या आकाराचे मेल कोणते हे शोधायचे म्हणजे झाले.   हे कसे शोधाल? जीमेल ओपन करा. वर Search  in Mail असे दिसेल तिथे larger :10MB असे टाईप करा. म्हणजे तुमच्ये मेलमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त एमबीचे किती मेल आहेत ते लगेच कळेल. त्यातले अगदी आवश्यक असतील तेच ठेवा. जितके जास्त मेल काढून टाकाल तेवढी स्पेस वाढेल.   दुसरा मार्ग म्हणजे Search  in Mail असे दिसेल तिथे उजव्या बाजूला असलेल्या चिन्हावर क्लिक करा. तिथे जास्त पर्याय मिळतात. समजा एखाद्या  व्यक्तीकडून आलेले मेलच शोधायचे असतील तर तसे शोधता येता...

प्लसची गंमत !

  अ नेक लोक इमेल सेवा वापरताना वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे इमेल आयडी तयार करतात. एक इमेल कार्यालयीन कामासाठी, एक कौटुंबिक कामासाठी आणि एखादा इतर कामासाठी. तुम्ही ज्या कार्यालयात काम करता त्यांच्या 'डोमेन नेम'चा आयडी वापरणे आवश्यक असते हे खरे, पण इतर कामांसाठी वेगवेगळे आयडी तयार करण्याची खरे म्हणजे काहीच गरज नसते. जीमेलने एक वेगळी सोय उपलब्ध करून दिली आहे. समजा तुमचा आयडी abcd@gmail.com आहे. @ चिन्हाच्या आधी असलेल्या अक्षरांच्या पुढे + चे चिन्ह वापरून वेगळा आयडी तयार करू शकता. उदा. abcd+News@gmail.com, abcd+family@gmail.com, abcd+personal@gmail.com असे आयडी तयार होऊ शकतात. या इमेलवर पाठवलेले सगळे मेल abcd@gmail.com याच इमेलच्या इनबॉक्समध्ये येतील. वेगवेगळे इनबॉक्स ओपन करण्याची गरज नाही.   तुम्ही तयार केलेल्या इमेल आयडीचे मेल एकाच इनबॉक्समध्ये येत असल्याने इथे फिल्टरचा वापर करा. किंवा लेबलचा वापर करा. म्हणजे abcd+News@gmail.com या इमेल आयडीसाठी News लेबल करू शकता, तसेच abcd+family@gmail.com साठी Family लेबल होऊ शकते वगैरे. एकच आयडीमध्ये सगळे मेल मिळावा, त्यांचे व्यवस्थापन जास्...

अनेक मेल पाठवा एकाच मेलमध्ये !

इमेज
 आपला जीमेलचा इनबॉक्स भरत आला की 'वजनदार' मेल delete करणे अथवा फॉरवर्ड करणे हा एक मार्ग असतोच. वजनदार मेल कसे शोधायचे ते मी आधी सांगितले आहेच. (https://ashokpanvalkar.com/nb-110622/) हे वजनदार मेल अथवा अन्य महत्वाचे मेल एकेक करून फॉरवर्ड करत बसण्यात वेळ फार जातो. समजा तुम्हाला जीमेलमधले दहा मेल फॉरवर्ड करायचे आहेत. दहा वेळा मेल फॉरवर्ड करायची गरज नाही. जे मेल पाठवायचे आहेत ते सिलेक्ट करा (उघडू नका). उभ्या तीन ठिपक्यांच्या दांडीवर क्लिक करा. त्यात तळाला Forward As Attachment असा पर्याय दिसेल तो सिलेक्ट करा. मेल कोणाला पाठवायचे आहेत त्याचा पत्ता टाका आणि पाठवून द्या. एकाच मेलमध्ये हे दहा मेल त्याला मिळतील. त्याला जेव्हा हे मेल पाहायचे असतील तेव्हा त्याने त्या मेलच्या attachment वर क्लिक केले की तो मेल डेस्कटॉपवर Download होईल. मग त्यावर क्लिक केले की ओपन होईल. ही सोय आणखी एका बाबतीत उपयोगी पडते. तुम्ही कार्यालयीन काम करताना समजा एका व्यक्तीशी मेलद्वारे बोलत आहात. म्हणजे तुमच्या मेलवर त्याचा रिप्लाय, परत तुमचा रिप्लाय वगैरे. त्याच विषयातले मेल तुम्ही आधी इतरांना पाठवले असतील तर ते...

Trash मधून डिलीट केलेले मेल मिळवा परत

इमेज
  जीमेल, आऊटलूक आणि याहू या तीन मेलसेवांपैकी जीमेल सर्वात जास्त लोकप्रिय आहे. कार्यालयीन कामांसाठी अथवा वैयक्तिक कामासाठीही या जीमेलचा वापर होतो. ज्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे भरपूर मेल येतात, त्यांना ते रोज बघून त्यावर काम करणे शक्य असतेच असे नाही. मग वेळ असेल तेव्हा मेल बघायचे, delete करायचे अथवा गरजेप्रमाणे कृती करायची असे बरेच लोक करतात. या गडबडीत एखादा महत्वाचा मेल चुकून delete होऊ शकतो. ते वेळीच लक्षात आले तर Trash किंवा Bin फोल्डरमध्ये जाऊन आपण तो मेल परत मिळवू शकतो. (जे मेल हवे असतील ते सिलेक्ट करून Restore to Inbox केले की झाले.) पण Trash मधूनही delete झाले असले तर ? म्हणजे आपण Delete forever वर क्लिक केले असले तर ? मेल Trash मधूनही Delete केले असले तर ते परत मिळणार नाहीत, असे गूगल म्हणत असले तरी गूगलनेच आपल्याला एक संधी दिली आहे. अगदी एका मिनिटात हे मेल परत मिळवता येतात. कसे? तुम्ही वापरत असलेला ब्राउझर ओपन करा. तिथे Support.Google.com असे टाइप करा. मग पुढील पेज ओपन होईल. गूगलची वेगवेगळी अँप तिथे दिसतील. त्यातले जीमेल निवड. मग How Can We Help you असे लिहिले आहे तिथे Rec...

2SV वापरताय ना ?

इमेज
 तुम्ही कोणतेही इमेल अकाऊंट वापरत असाल तर त्याचा पासवर्ड हॅक केला जाण्याची भीती सतत असतेच. इमेल खाते हॅक झाल्यास आपला सगळा डेटा हॅकरच्या ताब्यात जातोच, परंतु त्याचा आर्थिक फटका बसण्यचीही शक्यता मोठी असते. आजच एका वर्तमानपत्रात ' इमेल हॅक करून ओटीपी मिळवला' अशा आशयाची बातमी वाचली. म्हणूनच या 2SV चे महत्व अनन्यसाधारण आहे. 2SV म्हणजे 2 Step  verification. हे जर  ON केलेले असेल तुम्ही जीमेलला लॉगिन केल्यावर तुमच्या फोनवर जीमेल विचारणा करील. हे लॉगिन मंजूर करायचे का असे विचारेल. तुम्ही होकार दर्शविल्याशिवाय लॉगिन होणार नाही. म्हणजेच तुमचा पासवर्ड हॅक झाला तरी 2 Step  verification ची सोय असल्यास हॅकरला लॉगिन करता येणार नाही.   आणि तुमचा डेटा सुरक्षित राहील. हे 2 Step  verification. कसे वापराल?   जीमेल ओपन करा. नंतर Settings  -See All  Settings  - Accounts  and  Import  - Other Google Account settings -  Security - 2 Step  verification  या मार्गाने जा. नंतर Get  Started  वर क्लिक करा. इथे जीमेल तुम...

हे 'फिल्टर' वापराच !

इमेज
 जीमेल मध्ये Filter and Block Addresses या सेटिंगचा वापर नियमितपणे केला तर इनबॉक्स सुटसुटीत ठेवण्यासाठी आणि तुमचे काम वेगवान होण्यासाठी खूपच मदत होते. काही वेळेला आपल्या इनबॉक्समध्ये स्पॅम मेसेजेस येतात. खरे म्हणजे जीमेलचे स्पॅम डिटेक्शन खूप चांगले आहे आणि शक्यतो स्पॅम मेसेज इनबॉक्स मध्ये येत नाहीत. ते सरळ स्पॅम फोल्डरमध्ये जातात तरीही काही नको असलेले ईमेल तुम्हाला आले आणि ते नियमित येत असले तर ते ब्लॉक करता येतात. त्यासाठी Filter and Block Addresses ही सोय खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी जीमेल ओपन करा. सेटिंग मध्ये जा. See All settings वर क्लिक करा. नंतर Filter and Block Addresses वर क्लिक करा. Create New filterअसा पर्याय खाली दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर पुढे दर्शवल्याप्रमाणे विंडो ओपन होईल. ज्या व्यक्तीकडून अथवा संस्थेकडून तो स्पॅम ईमेल येत आहे त्या व्यक्तीचा / संस्थेचा ईमेल ऍड्रेस तुम्ही Fromच्या पुढे टाकला आणि क्रिएट फिल्टरवर क्लिक केले की नंतर तुम्हाला त्या ई-मेलचे काय करायचे याचे पर्याय दिसतात. तो मेल थेट डिलीट व्हावा किंवा स्पॅममध्ये जावा किंवा तो ऍड्रेस कायमचा ब्लॉक व्हा...

हे 'फिल्टर' वापराच !

इमेज
 जीमेल मध्ये Filter and Block Addresses या सेटिंगचा वापर नियमितपणे केला तर इनबॉक्स सुटसुटीत ठेवण्यासाठी आणि तुमचे काम वेगवान होण्यासाठी खूपच मदत होते. काही वेळेला आपल्या इनबॉक्समध्ये स्पॅम मेसेजेस येतात. खरे म्हणजे जीमेलचे स्पॅम डिटेक्शन खूप चांगले आहे आणि शक्यतो स्पॅम मेसेज इनबॉक्स मध्ये येत नाहीत. ते सरळ स्पॅम फोल्डरमध्ये जातात तरीही काही नको असलेले ईमेल तुम्हाला आले आणि ते नियमित येत असले तर ते ब्लॉक करता येतात. त्यासाठी Filter and Block Addresses ही सोय खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी जीमेल ओपन करा. सेटिंग मध्ये जा. See All settings वर क्लिक करा. नंतर Filter and Block Addresses वर क्लिक करा. Create New filterअसा पर्याय खाली दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर पुढे दर्शवल्याप्रमाणे विंडो ओपन होईल. ज्या व्यक्तीकडून अथवा संस्थेकडून तो स्पॅम ईमेल येत आहे त्या व्यक्तीचा / संस्थेचा ईमेल ऍड्रेस तुम्ही Fromच्या पुढे टाकला आणि क्रिएट फिल्टरवर क्लिक केले की नंतर तुम्हाला त्या ई-मेलचे काय करायचे याचे पर्याय दिसतात. तो मेल थेट डिलीट व्हावा किंवा स्पॅममध्ये जावा किंवा तो ऍड्रेस कायमचा ब्लॉक व्हा...

Templates वापरुन बघा !

इमेज
 आपल्याला आलेल्या मेलला उत्तर देताना काही वेळेस एकसारखा मजकूर द्यावा लागतो. उदा. कोणी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मेलवर पाठवल्या असतील, एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण आपल्याला कोणाला पाठवायचे असेल, किंवा काही कारणाने तुमचे अभिनंदन करणारे मेल आले असतील त्यांना उत्तर द्यायचे असेल, तर त्यांचे उत्तर, ''वाढदिवस शुभेच्छाबद्दल आभारी आहे', माझ्या अमुक एका कार्यक्रमाला यावे', किंवा 'आपण अभिनंदन केल्यामुळे खूप बरे वाटले, मी आपला आभारी आहे', वगैरे उत्तरे आपण पाठवतो. आता Whatsapp किंवा Telegram च्या जमान्यात अशा गोष्टी मेलवर येणे कमी झाले असले तरी या कारणासाठी मेलचा उपयोग अजूनही काहीजण करतात. अशी उत्तरे तयार करून ठेवणे आणि ती पटकन पाठवणे हा एक सोपा पर्याय जीमेलमध्ये उपलब्ध आहे. त्याला Templates असे नाव आहे. हे कसे तयार कराल? जीमेल ओपन करा. Compose बटनावर क्लिक करा. तुम्हाला जो मजकूर लोकांना पाठवायचा आहे तो type करा. मग खाली उजव्या बाजूला उभी तीन टिम्ब दिसतील त्यावर क्लिक करा. मग Templates वर क्लिक करून save Drafts as Templates वर क्लिक करा. ते कोणत्या नावाने सेव्ह करायचे ...

वापरा Confidential Mode !

 आपण एखाद्याला खासगी किंवा कार्यालयीन कामासाठी अत्यंत महत्वाचा मेल पाठवताना अधिक काळजी घेतो. तरीही ज्याला मेल पाठवायचा त्याचा पासवर्ड आणखी कोणाला माहीत असला तर ? मग काय सुरक्षा राहिली? हे लक्षात आल्याने जीमेलने confidential mode उपलब्ध करून दिला आहे. या मोडमधून मेल पाठवल्यास अधिक सुरक्षा मिळते. कसा पाठवायचा हा मेल? जीमेल ओपन करा. नेहेमीसारखा मेल तयार करा. खाली उजवीकडे घड्याळ व मागे कुलूप असे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करून Turn on confidential mode यावर क्लिक करा. टी सुविधा सुरु होईल. समाज तुम्ही तो मोड आधीच activate केला असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही. तेथे एडिट बटण असेल त्यावर क्लिक करा. तिथे दोन पर्याय दिसतील. "No SMS passcode," आणि "SMS passcode," . यातला दुसरा पर्याय निवडा. सेव्ह करा. आणि मेल पाठवा. जो "SMS passcode," सेट केला आहे तो ज्याला मेल पाठवायचा आहे त्याला SMS करून पाठवा. किंवा फोन करून सांगा. तो कोड वापरल्यावरच त्या व्यक्तीला मेल ओपन करता येईल. तुम्ही "No SMS passcode," हा पर्याय निवडला असेल तर कोणत्याही कोडशिवाय ती व्यक्ती मेल ओपन...