ChatGPT शिका, नोकरी मिळवा !
स ध्या तंत्रज्ञान क्षेत्रात ChatGPT आणि AI हे शब्द इतके रुजले आहेत की याशिवाय इंटरनेट वापरणे हा गुन्हा आहे की काय असे वाटू लागले आहे. या ChatGPT मुळे नेमका काय परिणाम होईल, किती नोकऱ्या जातील अथवा निर्माण होतील हे अजून पुरेसे स्पष्ट झालेले नाही. ChatGPT हे नवीन आहे आणि अनेक सोयी आहेत हे खरे असले तरी सर्व काही या तंत्रज्ञानावर सोपवून मोकळे व्हायचे की स्वतः काही विचार करून लेखन करायचे याचाही निर्णय करावा लागेल. आयते मिळणारे सगळेच काही चांगले नसते हे लक्षात ठेवलेले बरे ! नोकरी मिळण्यासाठी प्रत्येक क्षेत्रानुसार, पदानुसार, गरजेनुसार शैक्षणिक वा कामाची पात्रता लागते. आधीच नवीन नोकरी मिळविण्यात अडचण आणि त्यात कंपन्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा पाहिल्या तर भविष्यकाळात नोकरी मिळवणे किती कठीण जाणार आहे, हे लक्षात येते. जपानमधल्या एका कंपनीचे उदाहरण लक्षात घ्या. टोकियो शहरात काम करणाऱ्या LayerX Inc. या कंपनीने जाहीर केले आहे की नोकरीसाठी उत्सुक असाल तर तुम्हाला ChatGPT टाळून चालणार नाही. ChatGPT संदर्भात परीक्षा द्यावी लागेल, OpenAI Inc., आणि Notion AI. यांनी तयार केलेल्या ChatGPT वर काम करता...