इंस्टाग्रामने आणली ब्रॉडकास्ट चॅनेल्स
आज परस्पर संवादासाठी टेलिग्रामपेक्षा Whatsapp जास्त वापरले जात असले तरी टेलिग्रामच्या काही फीचर्सची ओढ अनेकांना असते. टेलेग्रामवर एखादे चॅनेल तयार केले की लाखो लोकांपर्यंत एकाच वेळेस पोचता येते ही मोठी जमेची बाजू आहे. Whatsapp ने Communities चा पर्याय आणला खरा, पण त्याला टेलिग्रामच्या चॅनेलची सर नाही, असे अनेकांना वाटते. आता चॅनेलची ही कल्पना इंस्टाग्रामने उचलली आहे. आज मार्क झकरबर्ग यांनी स्वतःचे 'मेटा चॅनेल' लाँच केले. अमेरिकेतील काही निवडक लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. आता टप्प्याटप्प्याने ती सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. इंस्टाग्राम Creators त्यांच्या चाहत्यांच्या / मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी या चॅनेलचा वापर करू शकतात. त्यासाठी text, photo, video, voice notes ,polls इतके पर्याय त्यांना उपलब्ध आहेत. 'मेटा' कंपनीने ही सुविधा उपलब्ध करून देताना म्हटले आहे की, ''Broadcast channels are a public one-to-many messaging tool that creators can invite all of their followers into and share text, video and photo updates.''. या चॅनेलमध्ये फक्त Creator...