पोस्ट्स

APPLE लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आयफोनवरील फोटो बघा विंडोजवर

 आयफोन, आयपॅड, मॅकवर घेतलेले फोटो विंडोजमध्ये कसे घ्यायचे हा प्रश्न अनेकांना पडलेला होता. आता तुमच्याकडे विंडोज ११ असेल तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटणार आहे. विंडोज ११ च्या फोटो अँपमध्ये सुधारणा करण्यात आली असून आयफोन, आयपॅड, मॅकवर घेतलेले फोटो विंडोज मध्ये सहज दिसणार आहेत. मात्र त्यासाठी वापरकर्त्यांना icloud for  windows  अँप डाउनलोड करून त्याचे लॉगिन करावे लागेल.   विंडोज ११ ने हे Update सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिले असून टप्प्याटप्प्याने ते येत्या १५ दिवसांत सगळ्यांना मिळेल. विंडोज १० मध्ये मात्र ही सुविधा मिळणार नाही. त्यातील फोटो अँप जुन्या version चे आहे. तरी तुम्हाला आयफोनवरचे फोटो / व्हिडिओ गूगल फोटोज मध्ये ट्रान्सफर करता येतात. कसे? आयफोनवर गूगल १ हे अँप डाउनलोड करा. गूगल खात्याचे लॉगिन करा. फोटो/ विडिओ/ कॉन्टॅक्टस Sync करा. झाले काम. आयफोनवर फक्त पाच जीबी डेटा फुकट मिळतो. हा खूपच कमी आहे. असे फोटो / व्हिडिओ ट्रान्सफर करत राहिलात तर हा डेटा पुरवून वापरता येईल.   Apple कंपनीने Apple  Music हे अँप विंडोजवर आणले आहे. पुढील वर्षी Apple  TV सुद्धा येई...