पोस्ट्स

FACEBOOK लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फेसबुक रील्स आता ९० सेकंदांची !

 रील्स (Reels) हा इंस्टाग्राममधला वापरकर्त्यांचा  एक आवडता प्रकार आहे. स्वतः रील्स न टाकणारेही एकदा रील्स बघायला लागले की त्यांचा अर्धापाऊण तास कसा जातो ते काळातच नाही. हेच रील्स फेसबुकवर येऊन आठ महिने झाले. फेसबुकने आज त्याची कालमर्यादा वाढवली असून आता ६० सेकंदांऐवजी ९० सेकंदाचें रील्स टाकता येणार आहेत. याचबरोबर काही नवीन सोयीही फेसबुकने दिल्या आहेत.   या रील्सची निर्मिती करणाऱ्यांसाठी फेसबुकने 'Grooves' नावाने नवी सुविधा दिली आहे. रील्समधील मोशनसाठी जे गाणे ऍड केले असेल त्या गाण्याशी हे मोशन जुळवले जाईल. म्हणजेच गाण्यातील मोशन वेगळी आणि गाण्याचा ठेका वेगळा असे होणार नाही. visual beat टेकनॉलॉजि चा वापर करून हे केले जाईल. याशिवाय, Memories विभागातून आवडत्या आठवणींचे रेडिमेड रील्स शेअर करण्याची सोयही करण्यात आली आहे.   गेल्या सहा महिन्यांत फेसबुक व इंस्टाग्रामवर रील्स Re-share करण्याचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त वाढल्याचे 'मेटा' कंपनीला लक्षात आले. त्याचप्रमाणे रील्स बघण्याचे प्रमाणही दुपटीपेक्षा जास्त वेगाने वाढले आहे. त्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले.   'मेटा' कंपन...

मेसेंजर अधिक आकर्षक !

  स माजमाध्यमांवर संवाद साधताना end-to-end encrypted chats चे फार महत्व असते. तुम्हाला मेसेज पाठवणारा आणि तुम्ही या शिवाय तो मेसेज कोणीही (म्हणजे फेसबुक, मेसेंजर, whatsapp वगैरे) मध्ये वाचू शकत नाही. म्हणून end-to-end encrypted chats सुविधा सेटिंग मध्ये जाऊन सेट करणे गरजेचे असते. Whatsapp ने end-to-end encrypted chats ची सुविधा आधीच दिली आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक मेसेंजरनेही ती दिली. याच सुविधेत मेसेंजरने आजपासून काही नव्या सोयी दिल्या आहेत. Chat themes: सध्या बॅकग्राऊंडवर चाट करण्यापेक्षा आकर्षक बॅकग्राऊंड असली तर केव्हाही चांगली. म्हणून मेसेंजरने नव्या Chat थिम्स उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र त्या वापरताना चॅट वाचताना डोळ्याला उगाच ताण येईल अशी थीम घेऊ नका. Custom chat emojis and reactions: आता स्वतःची वेगळी प्रतिक्रिया देण्यासाठी खास ईमोजी वापरू शकता. अनेक इमोजीनमधून स्वतःच्या वेगळ्या ईमोजी निवडू शकाल. Group profile photos: खासगी चॅट, कार्यालयीन लोकांबरोबर केलेला चॅट वगैरेसाठी वेगवेगळा ग्रुप प्रोफाइल फोटो ठेवू शकता. Link previews: चॅटमध्ये कोणी एखादी लिंक दिली तर त्यावर...

वाट्टेल तिथे फेसबुक लॉगिन करू नका !

 इंटरनेट सर्फिंग करताना अनेकांना फोनवर वेगवेगळी अँप डाउनलोड करण्याची हौस असते. ती नवीन अँप वापरून बघायची, आवडल्यास, उपयुक्त वाटल्यास ठेवायची अथवा काढून टाकायची असा खेळ चालत असतो. परंतु Apple आणि गूगल अँप स्टोअर वरची सगळीच अँप सुरक्षित आहेत असे समजण्याचे कारण नाही. फेसबुकने आजच याबाबत इशारा दिला आहे आणि सावध राहण्याची सूचना केली आहे. चुकीची / फसवी अँप डाउनलोड केल्याने दहा लाखांपेक्षा अधिक लोकांचे फेसबुक लॉगिन / पासवर्ड वगैरे तपशील 'पळविले' गेल्याचे फेसबुकने म्हटले आहे. हे कसे झाले? या लोकांनी गेम्स, फोटो एडिटर व इतर लोकप्रिय श्रेणीतील (भविष्य सांगणारी काही अँपसुद्धा) फसवी अँप्स डाउनलोड केली होती. अशी ४०० पेक्षा अधिक अँप्स अस्तित्वात आहेत. अशा अँपचे Review / रेटिंग्स फसवे असतात. आमचे अँप डाउनलोड केल्यास फुकटात full functionality मिळेल असे आश्वासन दिलेले असते. त्याला भुलून ही अँप्स डाउनलोड केल्यावर, ''आता फेसबुक लॉगिन वापरून अँप वापरायला सुरुवात करा'', असा मेसेज येतो. चांगले अँप मिळते आहे या आनंदात ग्राहक फेसबुक लॉगिन करतात. त्याबरोबर त्या अँपच्या निर्मात्याला तुमच...