पोस्ट्स

WHATSAPP लेबलसह पोस्ट दाखवत आहे

#whatsapp वर शोधा तारीखवार मेसेज

  भा रतात आजमितीला जवळपास ४८ कोटी लोक whatsapp वापरतात. सध्या परस्पर संवादाचे ते एक प्रमुख साधन झाले आहे. सुप्रभात ते शुभरात्रीपर्यंतचे सगळे मेसेज त्यावर येऊन आदळत असतात. तुमची इच्छा असो, वा नसो ! फार थोडे लोक / ग्रुप असे वायफळ मेसेज टाळतात आणि फक्त आवश्यक ते महत्वाचे मेसेज पाठवतात. भरपूर मेसेज साठले की कालांतराने एखादा मेसेज शोधायचा झाल्यास अडचण होते. Keyword देऊन तो मेसेज शोधू शकता हे खरे असले तरी त्यामुळे नेमका मेसेज मिळेलच याची खात्री नसते. तुम्ही आयफोन वापरत असाल तर त्यावर तारखेने मेसेज शोधू शकता. समाज एक जानेवारीच्या मेसेज, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आलेले मेसेज अथवा एखाद्या विशिष्ट तारखेचे मेसेज शोधणे सोपे झाले आहे. ज्या लोकांचे / ग्रुपचे विशिष्ट तारखेचे मेसेज शोधायचे आहेत ते चॅट उघडा. लोकांच्या अथवा ग्रोउपचा नावावर टॅप करा. ऑडिओ, शेअर आणि सर्च असे तीन पर्याय दिसतील. त्यातील सर्चवर टॅप करा. खाली उजवीकडे कॅलेंडरचे चिन्ह दिसेल. त्यावर टॅप करा. तुम्हाला हवी ती तारीख शोधा. ओके म्हणा, तुम्ही लगेच त्या तारखेच्या चॅटवर जाल. हवा तो मेसेज पटकन मिळू शकेल. या आठवड्यात whatsapp ने आयफोन...

whatsapp ने दिल्या काही उपयुक्त सुविधा !

 सध्याचे सर्वात लोकप्रिय माध्यम असलेल्या whatsapp ने या महिन्यात ग्राहकांसाठी बऱ्याच नवीन सुविधा आणल्या आहेत. सात फेब्रुवारीला त्यांनी Status Update च्या संदर्भात काही सुविधा दिल्या. वापरकर्ते आता ईमोजी वापरू शकतात , Voice Message शेअर करू शकतात. या सुधारणांचे पुढचे पाऊल म्हणून whatsapp ने आता एका वेळेस १०० फोटो एका मेसेजमध्ये पाठविण्याची 'सोय' केली आहे. ग्रुप Subject देण्यासाठी अधिक जागा उपलब्ध करून दिली आहे. Profile फोटोंच्या जागी 'अवतार' टाकण्याची सोय दिली आहे. शिवाय इथे तुम्ही स्टिकर्सही टाकू शकता. तुम्हाला एखादे Document पाठवायचे असेल तर ते पाठवताना त्यावर Caption सुद्धा देऊ शकता. हे सगळे बदल अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांची आहेत. बहुतांश लोक हेच फोन वापरत असल्याने त्यांना हा फायदा होणार आहे. सध्या एका मेसेजमध्ये एकावेळी जास्तीत जास्त ३० फोटो पाठवता यायचे. ही मर्यादा आता १०० पर्यंत वाढविण्यात आली आहे. यात व्हिडिओचाही समावेश करता येईल. असे असले तरी खरोखरच एवढे फोटो पाठविण्याची गरज आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. आपण एखाद्या ट्रीपला गेल्यावर अथवा एखाद्या समारंभाला एवढे...

आता Whatsapp चेही अवतार

  स माजमाध्यमांवर स्वतःचा फोटो देण्याऐवजी 'अवतार' (स्वतःच्या चेहेऱ्यामोहऱ्याशी जुळणारे चित्र अथवा अन्य कोणत्याही हावभावातील चित्र असे आपण म्हणू या ) देण्याची सुविधा इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर या तीनही प्लॅटफॉर्मवर होतीच. आजपासून Whatsapp वरही ही सेवा उपलब्ध होत आहे. Whatsapp ने ३६ विविध भावभावना अथवा कृती दर्शविणारे ३डी अवतार वापरकर्त्यांसाठी आणले आहेत. स्वतःचा चेहेरा लपविणे व त्यायोगे सुरक्षितता मिळविणे हा हेतू त्यामुळे साध्य होणार असला तरी सगळ्यांचे एकसारखे 'अवतार' झाले तर माणसे ओळखायची कशी हा प्रश्नच आहे. अशामुळे कोणाचीही फसगत होऊ नये म्हणजे झाले. Whatsapp ने आणलेले अवतार हे स्नॅपचॅटचे बिटमोजी आणि apple चे मेमोजी यांच्यासारखे दिसतात अशी चर्चा आहे. ते वापरल्यावरच कळेल. Whatsapp च्या settings मध्ये जाऊन हे अवतार तयार करता येतील. शिवाय आपण जेथे Profile फोटो वापरतो, तेथेही Use Avatar असा पर्याय दिसेल. लवकरच या अवतारामागची प्रकाशयोजना, शेडींग आणि केशरचनेत वैविध्य जाणारे अवतारही उपलब्ध करून देऊ असे Whatsapp ने म्हटले आहे. मात्र एक लक्षात ठेवा. तुम्ही Whatsapp वर तयार ...

Whatsapp Community कशी तयार कराल ?

 समाजमाध्यमांवर संवादाचे प्रमुख साधन असणाऱ्या Whatsapp ने गेल्या आठवड्यात सर्वांसाठी Communities म्हणजेच 'समूह' आणले असल्याची घोषणा केली आणि आता जवळपास सर्वानाच ही सुविधा उपलब्ध झाली आहे. ती कशी वापरायची? आधी Whatsapp उघडा. वर उजव्या बाजूला compose चे चिन्ह असेल त्यावर क्लिक करा. नवीन ग्रुप , नवीन कॉन्टॅक्ट आणि नवीन community असे पर्याय दिसतील. त्यातील नवीन community यावर क्लिक करा. नवीन community चे नाव द्या. ते २४ characters पेक्षा कमीअसले पाहिजे. community कशासाठी तयार करत आहात त्याचे वर्णन लिहा. Profile फोटो अपलोड करा. नंतर green arrow आयकॉन दिसेल त्यावर टॅप करून तुम्ही सध्या ज्या ग्रुपमध्ये आहात ते सगळे किंवा निवडक ग्रुप add करा. सध्याचे ग्रुप घ्यायचे नसतील तर स्वतंत्र नवे ग्रुप तयार करू शकता. ग्रुप add करून झाले की green check mark आयकॉन वर क्लिक करा. एका community मध्ये जास्तीतजास्त ५० ग्रुप समाविष्ट करू शकता. तुम्ही community तयार केल्यावर एक Announcement ग्रुप आपोआप तयार होईल. इथे टाकलेला मेसेज सर्वाना मिळेल. या ग्रुपमध्ये जास्तीतजास्त पाच हजार मेंबर होऊ शकतात. म्हणजेच...

आले Whatsapp समुदाय, १०२४ जणांचा ग्रुप आणि ३२ जणांचा व्हिडिओ कॉल !

  भा रतासह जगभरात इंटरनेट आल्यापासून एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी विविध साधने उपलब्ध होत आली आहेत. इमेल हे त्यातील एक. परंतु गेल्या दशकभरात विविध समाजमाध्यमानी वापरकर्त्यांच्या मनावर ताबा मिळवला आणि आपण १५ वर्षांपूर्वी या समाजमाध्यमांशिवाय कसे जगत होतो असा प्रश्न पडला. (खरे म्हणजे आनंदात जगत होतो) . WhatsApp आल्यापासून आणखी चित्र बदलले. आज भारतात जवळपास ५२ कोटी लोक WhatsApp नियमित वापरतात. जगभरात हा आकडा जवळपास दोन अब्ज इतका आहे. (माहितीसाठी – फेसबुक १.३ अब्ज लोक वापरतात) .आपला वापर वाढता राहावा म्हणून WhatsApp सतत सुधारणा करत असते, नवनवीन सोयी ग्राहकांना देत असते. दि. १४ एप्रिल २०२२ रोजी WhatsApp ने नवीन घोषणा केली होती. ही सोय होती Community ची. आज जवळपास सात महिन्यांनंतर ती प्रत्यक्षात येत आहे. WhatsApp ग्रुप चे admin या community म्हणजे समुदाय तयार करू शकतील. सध्या २५६ वापरकर्त्यांचा एक ग्रुप बनू शकतो. नंतर हा आकडा ५१२ करण्यात आला. आज तर हा आकडा १०२४ करण्यात आला. असे अनेक ग्रुप एकत्र केले की समुदाय तयार करता येईल. समुदाय तयार करण्यासाठी नवीन ग्रुप admin तयार करू शकतील अथवा सध्य...

आता Whatsapp वर मिळतील या सुविधा

 आज माणसाच्या गरजा पाचच. अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी आणि Whatsapp . यातला विनोद सोडून द्या, पण आज परस्पर संवादाचे प्रमुख साधन म्हणून Whatsapp कडे पाहिले जाते ही वस्तुस्थिती आहे. या Whatsapp मध्ये आजपासून टप्प्याटप्याने दोन महत्वाच्या सुविधा मिळणार आहेत. आपण गूगल मीट किंवा झूम वर कॉल करताना त्याची लिंक शेअर करू शकतो, तशीच लिंक आपण आता Whatsapp कॉलचीही करू शकणार आहोत. ती लिंक आपण ज्यांना पाठवू तेही कॉलमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. दुसरी सुविधा आहे Whatsapp ग्रुप कॉलची. अशा ग्रुप कॉल मध्ये आतापर्यंत एकावेळी फक्त आठ जणांना सहभागी होता येत होते. Whatsapp ने हा आकडा चौपटीने वाढवला आहे. म्हणजेच आता आठऐवजी ३२ लोक कॉलमध्ये सहभागी होऊ शकतात. या दोन्ही सुविधांसाठी ज्यांनी Whatsapp अँप Update केले आहे असेच लोक सहभागी होऊ शकतात. त्यामुळे आजपासून येणारे update प्रत्येकाने डाउनलोड करणे आवश्यक आहे. असे केल्याने आणखी सुविधा मिळतील. असा एखादा ग्रुप कॉल कोणी बुक केला असेल आणि त्यावेळी लगेच जॉईन होणे तुम्हाला शक्य नसेल तर आधी मिळालेली लिंक वापरून तुम्ही मध्ये कधीही जॉईन होऊ शकता. अर्थात त्याआधी कॉल संप...