फेसबुक रील्स आता ९० सेकंदांची !
रील्स (Reels) हा इंस्टाग्राममधला वापरकर्त्यांचा एक आवडता प्रकार आहे. स्वतः रील्स न टाकणारेही एकदा रील्स बघायला लागले की त्यांचा अर्धापाऊण तास कसा जातो ते काळातच नाही. हेच रील्स फेसबुकवर येऊन आठ महिने झाले. फेसबुकने आज त्याची कालमर्यादा वाढवली असून आता ६० सेकंदांऐवजी ९० सेकंदाचें रील्स टाकता येणार आहेत. याचबरोबर काही नवीन सोयीही फेसबुकने दिल्या आहेत.
या रील्सची निर्मिती करणाऱ्यांसाठी फेसबुकने 'Grooves' नावाने नवी सुविधा दिली आहे. रील्समधील मोशनसाठी जे गाणे ऍड केले असेल त्या गाण्याशी हे मोशन जुळवले जाईल. म्हणजेच गाण्यातील मोशन वेगळी आणि गाण्याचा ठेका वेगळा असे होणार नाही. visual beat टेकनॉलॉजि चा वापर करून हे केले जाईल. याशिवाय, Memories विभागातून आवडत्या आठवणींचे रेडिमेड रील्स शेअर करण्याची सोयही करण्यात आली आहे.
गेल्या सहा महिन्यांत फेसबुक व इंस्टाग्रामवर रील्स Re-share करण्याचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त वाढल्याचे 'मेटा' कंपनीला लक्षात आले. त्याचप्रमाणे रील्स बघण्याचे प्रमाणही दुपटीपेक्षा जास्त वेगाने वाढले आहे. त्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले.
'मेटा' कंपनीने फेब्रुवारी २०२२ मध्ये अँड्रॉइड व ios अशा दोन्ही ग्राहकांसाठी रील्स लाँच केले होते. 'टिकटॉक'ला टक्कर म्हणून फेसबुक व इंस्टाग्राममध्ये रील्स आली. आता 'टिकटॉक'वर अनेक ठिकाणी बंदी आहे. फेसबुकचा वापरही वाढला असल्याचे सांगण्यात येते. रोज साधारण दोन अब्ज लोक फेसबुक वापरतात असा कंपनीचा दावा आहे. इंस्टाग्रामवर रील्सची वेळ ६०वरून ९० सेकंदांची केली त्यालाही आठ महिने होऊन गेले. म्हणूनच कदाचित रील्स या प्रकारचा जास्त प्रसार होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा