तंत्र-वृत्त
नेटफ्लिक्सची सेवा सध्या १९० देशांमध्ये आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना कोणी तगडा प्रतिस्पर्धी नव्हता. पण आता ऍमेझॉन, HBO , डिस्ने यांसारखे प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सच्या दर्शकांमध्ये घट झाली होती, २०२३मध्ये पुन्हा प्रेक्षक आपल्याकडे येत आहेत असा दावा नेटफ्लिक्सने केला आहे. पासवर्ड शेअरिंग बंद केल्यावर यात किती फरक पडतो ते पाहावे लागेल. कदाचित यावरच मार्ग म्हणून नेटफ्लिक्सने ३० देशांमधील आपले वर्गणीचे दर कमी केले आहेत. त्यात ब्रिटन, अमेरिका, भारत हे मात्र नाहीत. मलेशिया , इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, क्रोएशिया, व्हेनेझुएला, इराण, केनिया हे देश आहेत. या साऱ्या देशांमध्ये नवीन ग्राहक मिळावेत आणि आधीपासून असलेले टिकून राहावेत हा हेतू आहे.
........................
माजमाध्यमांवर आपण एकदा पाठवलेला मेसेज दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध झाली तर? आयफोनवर जे लोक iMessage वापरतात त्यांना ही सुविधा उपलब्ध आहे. मेसेज पाठवल्यावर दुरुस्त करता येतो, आधीची चूक सुधारता येते. आता Whatsapp ही सुविधा सगळ्यांना उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे, एवढेच नव्हे तर Whatsapp चा TestFlight beta प्रोग्रॅम वापरणाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे वृत्त WABetaInfo ने दिले आहे.
.................
इंस्टाग्रामचे सहसंस्थापक Kevin Systrom आणि Mike Krieger यांनी बातम्यांना वाहिलेले Artifact नावाचे अँप तयार केले आहे. विविध ठिकाणांहून या बातम्या घेतल्या जातील असे दिसते. अँपमध्ये AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल आणि तुम्हाला हव्या त्याच टॉपिकच्या बातम्या दिसतील अशी सुविधा मिळेल अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा