अवजड मेल कसे शोधाल?

 गातील दीड अब्जा लोकांपेक्षाही अधिक लोक जीमेल वापरतात. या जीमेलमध्ये फक्त १५ जीबी साठवणक्षमता फुकटात मिळते. परंतु आज एवढे विडिओ अथवा फोटो शेअर केले जातात की हा १५ जीबी डेटा कधी संपतो ते कळत नाही. वर्षाला १३०० रुपये देण्याची तयारी असेल तर १०० जीबी डेटा मिळतो हे खरे असले तरी अनेक जण १५ जीबीमध्येच काम करणे पसंत करतात. अनेक वेळा मोठ्या आकाराच्या फाईल्स मेलमध्ये असतात किंवा गूगल ड्राईव्ह मध्ये असतात. त्या कमी केल्या तर अधिक मेल / विडिओ / फोटो राहू शकतात. आपल्या मेलमध्ये मोठ्या आकाराचे मेल कोणते हे शोधायचे म्हणजे झाले.

 
हे कसे शोधाल? जीमेल ओपन करा. वर Search  in Mail असे दिसेल तिथे larger :10MB असे टाईप करा. म्हणजे तुमच्ये मेलमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त एमबीचे किती मेल आहेत ते लगेच कळेल. त्यातले अगदी आवश्यक असतील तेच ठेवा. जितके जास्त मेल काढून टाकाल तेवढी स्पेस वाढेल.
 
दुसरा मार्ग म्हणजे Search  in Mail असे दिसेल तिथे उजव्या बाजूला असलेल्या चिन्हावर क्लिक करा. तिथे जास्त पर्याय मिळतात. समजा एखाद्या  व्यक्तीकडून आलेले मेलच शोधायचे असतील तर तसे शोधता येतात. फक्त attachments असलेलेच मेल शोधायचे असले तरी तसे शोधू शकता.
 
गूगल ड्राईव्हमधल्या  'अवजड' फाइल्स कशा शोधाल? गूगल ड्राईव्ह ओपन करा. वर उजव्या बाजूला सेटिंगचे आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा. तीन पर्याय दिसतील, त्यातील सेटिंग्सवर क्लिक करा. नंतर तुम्हाला View  items  taking  up  storage असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्हाला सर्वात अवजड ते सर्वात कमी अवजड file दिसतील. सर्वात अवजड फाइल्स delete केल्यास जागा निर्माण होईल. हे करून बघा आणि जागा परत मिळवा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऐतिहासिक निकाल

आरोग्य अधिक जपायला हवे !

पहिल्या पानावरच्या लताबाई ...