सलग दोन वर्षे वापरात नसलेली जीमेल अकाऊंट होणार बंद !

 जीमेल ही सर्वांत जास्त वापरली जाणारी ईमेल सेवा आहे. ईमेल वापरणाऱ्या प्रत्येकाचे साधारणपणे एक तरी जीमेल अकाउन्ट असतेच. परंतु अनेकवेळा वेगवेगळी जीमेल अकाउंट ओपन केली जातात. आणि ती नंतर वापरली जातातच असे नाही. अनेकवेळा. अकाउंट ओपन केले जाते व नंतर ते कधी एकदाही परत ओपन केले जात नाही. एखाद ई मेल आयडीचांगला मिळत असेल तर अकाउंट ओपन होते. परंतु परत वापरले जात नाही. अशा लोकांसाठी काल गूगलने महत्त्वाची घोषणा केली आहे.

सलग दोन वर्षे जे अकाउंटला लॉगिन केले नसेल तर ते जीमेलचे अकाउंट. येत्या डिसेंबरपासून. डिलीट केले जाईल. जुनी अकाऊंट डिलीट करण्याचे काम. करण्यापूर्वी वापरकर्त्याला अनेक मॉर्निंग मेसेजेस पाठवले जातील. त्याने जो ई मेल आयडी ओपन केला आहे त्यावर आणि रिकव्हरी इमेल आयडी दिला असेल त्यावरही. गूगलचे म्हणणे असे आहे की सलग दोन वर्षे न वापरण्यात येणारे अकाउंट धोकादायक ठरू शकतात. ते हॅक झाल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. दोन वर्षे सलग न ओपन केलेले अकाउंट वापरकर्त्याला गरजेचे नाही. असे मानून गूगल ते अकाउंट डिलीट करायला सुरुवात करणार आहे.

पहिल्यांदा ज्यांनी अकाऊंट ओपन केले पण परत. कधीच लॉग इन केलेले नाही, अशी अकाउंट डिलीट केलीजातील. मात्र. ती अकाउंट वेगवेगळ्या संस्था, उदाहरणार्थ शाळा, उद्योग / कंपन्या यांची जीमेल अकाउंट असली तर त्याला मात्र हात लावला जाणार नाही. इतरांचे जीमेल अकाऊंट डिलीट झाल्यावर त्या अकाऊंटशी संबंधित सर्व डेटा, उदा. यूट्यूब, फोटो, मेल वगैरे सगळं डिलीट होईल आणि तो वापरकर्त्याला परत मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही जर जीमेल अकाउंटला गेल्या दोन वर्षात लॉग इन केले नसेल, तर ते वापरा. अथवा ते नको असल्यास त्याचा डेटा सुरक्षितरित्या अन्यत्र हलवून. ते अकाउंट स्वतःच डिलीट करून टाका.

काही वेळेस आपण वेगवेगळ्या अकाउंटवरचे मेल एखाद्या जीमेल अकाउंटला फॉरवर्ड करत असतो. पण जिथे हे मेल फॉरवर्ड होत आहेत ते अकाउंट सहसा ओपन करत नाही. दर तीनचार महिन्यांनी ते ओपन करत राहिलात तरच ते नीट चालू राहील, हे लक्षात ठेवा. ते अकाउंट पूर्ण म्हणजे १५ जीबी इतके भरले की तिथे मेल फॉरवर्ड होणेही बंद होईल. मग जागे होण्यापेक्षा हवी असलेली अकाउंट वापरत राहा, नको असलेली सरळ delete करा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऐतिहासिक निकाल

आरोग्य अधिक जपायला हवे !

पहिल्या पानावरच्या लताबाई ...