अनेक मेल पाठवा एकाच मेलमध्ये !
आपला जीमेलचा इनबॉक्स भरत आला की 'वजनदार' मेल delete करणे अथवा फॉरवर्ड करणे हा एक मार्ग असतोच. वजनदार मेल कसे शोधायचे ते मी आधी सांगितले आहेच. (https://ashokpanvalkar.com/nb-110622/) हे वजनदार मेल अथवा अन्य महत्वाचे मेल एकेक करून फॉरवर्ड करत बसण्यात वेळ फार जातो. समजा तुम्हाला जीमेलमधले दहा मेल फॉरवर्ड करायचे आहेत. दहा वेळा मेल फॉरवर्ड करायची गरज नाही. जे मेल पाठवायचे आहेत ते सिलेक्ट करा (उघडू नका). उभ्या तीन ठिपक्यांच्या दांडीवर क्लिक करा.

त्यात तळाला Forward As Attachment असा पर्याय दिसेल तो सिलेक्ट करा. मेल कोणाला पाठवायचे आहेत त्याचा पत्ता टाका आणि पाठवून द्या. एकाच मेलमध्ये हे दहा मेल त्याला मिळतील. त्याला जेव्हा हे मेल पाहायचे असतील तेव्हा त्याने त्या मेलच्या attachment वर क्लिक केले की तो मेल डेस्कटॉपवर Download होईल. मग त्यावर क्लिक केले की ओपन होईल.
ही सोय आणखी एका बाबतीत उपयोगी पडते. तुम्ही कार्यालयीन काम करताना समजा एका व्यक्तीशी मेलद्वारे बोलत आहात. म्हणजे तुमच्या मेलवर त्याचा रिप्लाय, परत तुमचा रिप्लाय वगैरे. त्याच विषयातले मेल तुम्ही आधी इतरांना पाठवले असतील तर ते वर दिलेल्या पद्धतीने attach करून पाठवता येतील. प्रत्येक मेल फॉरवर्ड करत बसण्याची गरज नाही.
हे करून बघा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा