Gmailify करा !
इमेल हा आजही कार्यालयीन कामासाठी आणि काही प्रमाणात वैयक्तिक कामासाठी आवश्यक आहे. अनेक कंपन्यांनी मेलवरचा भर कमी करून संवादाची नवीन माध्यमे स्वीकारली असली तरी आजही इमेलचे महत्व कमी झालेले नाही. प्रत्येक कंपनी आपले विशिष्ट डोमेन नेम वापरून ही सेवा वापरते. उदा. *.*@timesgroup.com असे इमेल आयडी असतात. कार्यालयीन कामासाठी असे अंतर्गत इमेल आयडी असले तरी खासगी कामासाठी बऱ्याच वेळा जीमेल / आऊटलूक / हॉटमेल / याहू यांची सेवा वापरली जाते. एका वेळेस अनेक इमेल आयडी तयार केलेले असू शकतात. अशा वेळेस प्रत्येक इमेल आयडी वेगवेगळा ओपन करून पाहणे त्रासाचे ठरते. तुम्ही जीमेल वापरत असाल तर इतर सेवांचे (आऊटलूक / हॉटमेल / याहू ) इमेल आयडी इम्पोर्ट अथवा Gmailify करू शकता.
हे Gmailify म्हणजे काय ? दुसऱ्या सेवेचा इमेल आयडी इम्पोर्ट करण्यासारखाच हा प्रकार आहे. परंतु इम्पोर्ट पेक्षा वेगळा आहे. समजा माझा *.*@याहू.कॉम हा इमेल आयडी आहे. तो Gmailify केल्यास याहूच्या आयडीवर दिसणारे सगळे मेल मला जीमेलमध्येही दिसतील. याहू आयडी ओपन करून बघण्याची गरज नाही. मी जीमेलमधूनच याहू आयडी वापरून मेल पाठवू शकतो. इम्पोर्टपेक्षा फरक हा की याहू आयडीवर आलेला एखादा मेल मी जीमेलमधून delete केला तर तो याहू अकाउंटमधूनही delete होतो. मेल इम्पोर्ट केलेला असेल तर तो फक्त एका ठिकाणाहून delete होतो. मग हे टाळण्यासाठी Check mail from other accounts:इथे जावे लागते. म्हणून Gmailify हा चांगला पर्याय दिसतो.
तोटा असा की एका वेळेस जीमेलमध्ये एकच इमेल आयडी Gmailify होऊ शकतो. दुसरे मेल इम्पोर्ट करू शकता.
हे Gmailify करण्यासाठी काय कराल? जीमेल ओपन करा. वर उजव्या बाजूला सेटिंगचे आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. नंतर Accounts and Import वर क्लिक करा. नंतर Check mail from other accounts: वर जा. तिथे जो जीमेलबाहेरचा इमेल आयडी Gmailify करायचा आहे, तो टाईप करा. पासवर्ड द्या. तुम्हाला हा इमेल आयडी Gmailify करायचा आहे की इम्पोर्ट करायचा आहे ते विचारले जाईल. तेव्हा Gmailify वर क्लिक करा. पुढच्या स्टेप्स करा. लगेच त्या इमेल आयडीवरील इमेल तुम्हाला जीमेलमध्ये दिसायला लागतील.
हे Gmailify अथवा इम्पोर्ट करायचे नसेल तर तुमचे सगळे इमेल आयडी जीमेल अथवा आऊटलूक अथवा याहू मेलवर फॉरवर्ड करू शकता. असे करताना मूळ आयडीमध्ये मेल save होणार नाहीत याची खबरदारी घ्या. अन्यथा दोन्हीकडे ते मेल राहतील.
जीमेल आणि आऊटलूक यांची क्षमता प्रत्येकी १५ जीबी असल्याने असे Gmailify करणे फायद्याचे ठरते. याहूची क्षमता एक टीबी म्हणजे १०२४ जीबी असल्याने तो वेगळा बघायचा असे ठरवू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा