Trash मधून डिलीट केलेले मेल मिळवा परत

 जीमेल, आऊटलूक आणि याहू या तीन मेलसेवांपैकी जीमेल सर्वात जास्त लोकप्रिय आहे. कार्यालयीन कामांसाठी अथवा वैयक्तिक कामासाठीही या जीमेलचा वापर होतो. ज्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे भरपूर मेल येतात, त्यांना ते रोज बघून त्यावर काम करणे शक्य असतेच असे नाही. मग वेळ असेल तेव्हा मेल बघायचे, delete करायचे अथवा गरजेप्रमाणे कृती करायची असे बरेच लोक करतात. या गडबडीत एखादा महत्वाचा मेल चुकून delete होऊ शकतो. ते वेळीच लक्षात आले तर Trash किंवा Bin फोल्डरमध्ये जाऊन आपण तो मेल परत मिळवू शकतो. (जे मेल हवे असतील ते सिलेक्ट करून Restore to Inbox केले की झाले.) पण Trash मधूनही delete झाले असले तर ? म्हणजे आपण Delete forever वर क्लिक केले असले तर ?

मेल Trash मधूनही Delete केले असले तर ते परत मिळणार नाहीत, असे गूगल म्हणत असले तरी गूगलनेच आपल्याला एक संधी दिली आहे. अगदी एका मिनिटात हे मेल परत मिळवता येतात. कसे? तुम्ही वापरत असलेला ब्राउझर ओपन करा. तिथे Support.Google.com असे टाइप करा. मग पुढील पेज ओपन होईल.

गूगलची वेगवेगळी अँप तिथे दिसतील. त्यातले जीमेल निवड. मग How Can We Help you असे लिहिले आहे तिथे Recovering emails असे टाईप करा. नंतर थोडे खाली जाऊन Gmail Message Recovery Tool.असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

इथे तुम्हाला तुमच्या गूगल अकाउंटवर लॉगिन करावे लागेल. ते केल्यावर पुढील पर्याय दिसेल.

नंतर शेवटी Continue बटनावर क्लिक करा. एका मिनिटात तुम्ही मागच्या ३० दिवसांत Trash मधूनही Delete केलेले मेल पुन्हा तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन पडतील.


या प्रक्रियेत दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे मागच्या ३० दिवसांतलेच मेल पुन्हा मिळवता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे दिलेले केलेले सगळेच्या सगळे मेल परत इनबॉक्समध्ये येतात. ही बाब थोडी अडचणीची ठरू शकते. समजा, तुम्ही मागच्या ३० दिवसांत ५०० मेल Delete केले आहेत आणि त्यातले फक्त दहा मेल तुम्हाला परत हवे आहेत तर हे दहाच मेल मिळविण्याची सोय नाही. सगळे ५०० परत येतील. म्हणजे त्यातले ४९० पुन्हा Delete करणे आले. यावरही आपण सोपा उपाय करू शकतो.

वरील सारी प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी एक काम करा. इनॉक्समध्ये असलेले सारे मेल काही काळासाठी एक नवा फोल्डर तयार करून त्यात हलवा. म्हणजे इनबॉक्स रिकामा राहील. मग वरील प्रक्रिया करून दिलेले केलेले मेल परत मिळवा. म्हणजे आता इनबॉक्समध्ये ५०० मेल असतील. (हा आकडा उदाहरण म्हणून दिला आहे, प्रत्येकासाठी हा आकडा वेगळा असू शकेल). या ५०० मधील हवे असलेले दहा मेल ठेवून बाकीचे Delete करा. म्हणजे आता इनबॉक्समध्ये दहाच मेल उरतील. आता मूळ इनबॉक्समधील मेल ज्या फोल्डरमध्ये आपण हलवले होते तो फोल्डर उघडून सगळे मेल सिलेक्ट करा आणि Move To inbox वर क्लिक करा. सगळे मेल इनबॉक्समध्ये हजर होतील.विषय संपला ! काही वेळा लोक chrome ब्राउझरमध्ये कायमचे लॉगिन करून ठेवतात. त्यांना वेगळे अकाउंट लॉगिन करण्याची गरज नाही.

अर्थात गुगलने ही सुविधा दिली असली तरी आपण मेल Delete करताना काळजी घ्यायला हवी हा मुद्दा महत्वाचा आहेच ! तुम्ही वर दिलेली प्रक्रिया केलीच तर मला जरूर अनुभव कळवा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऐतिहासिक निकाल

आरोग्य अधिक जपायला हवे !

पहिल्या पानावरच्या लताबाई ...