Trash मधून डिलीट केलेले मेल मिळवा परत
जीमेल, आऊटलूक आणि याहू या तीन मेलसेवांपैकी जीमेल सर्वात जास्त लोकप्रिय आहे. कार्यालयीन कामांसाठी अथवा वैयक्तिक कामासाठीही या जीमेलचा वापर होतो. ज्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे भरपूर मेल येतात, त्यांना ते रोज बघून त्यावर काम करणे शक्य असतेच असे नाही. मग वेळ असेल तेव्हा मेल बघायचे, delete करायचे अथवा गरजेप्रमाणे कृती करायची असे बरेच लोक करतात. या गडबडीत एखादा महत्वाचा मेल चुकून delete होऊ शकतो. ते वेळीच लक्षात आले तर Trash किंवा Bin फोल्डरमध्ये जाऊन आपण तो मेल परत मिळवू शकतो. (जे मेल हवे असतील ते सिलेक्ट करून Restore to Inbox केले की झाले.) पण Trash मधूनही delete झाले असले तर ? म्हणजे आपण Delete forever वर क्लिक केले असले तर ? मेल Trash मधूनही Delete केले असले तर ते परत मिळणार नाहीत, असे गूगल म्हणत असले तरी गूगलनेच आपल्याला एक संधी दिली आहे. अगदी एका मिनिटात हे मेल परत मिळवता येतात. कसे? तुम्ही वापरत असलेला ब्राउझर ओपन करा. तिथे Support.Google.com असे टाइप करा. मग पुढील पेज ओपन होईल. गूगलची वेगवेगळी अँप तिथे दिसतील. त्यातले जीमेल निवड. मग How Can We Help you असे लिहिले आहे तिथे Rec...