पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सलग दोन वर्षे वापरात नसलेली जीमेल अकाऊंट होणार बंद !

  जी मेल ही सर्वांत जास्त वापरली जाणारी ईमेल सेवा आहे. ईमेल वापरणाऱ्या प्रत्येकाचे साधारणपणे एक तरी जीमेल अकाउन्ट असतेच. परंतु अनेकवेळा वेगवेगळी जीमेल अकाउंट ओपन केली जातात. आणि ती नंतर वापरली जातातच असे नाही. अनेकवेळा. अकाउंट ओपन केले जाते व नंतर ते कधी एकदाही परत ओपन केले जात नाही. एखाद ई मेल आयडीचांगला मिळत असेल तर अकाउंट ओपन होते. परंतु परत वापरले जात नाही. अशा लोकांसाठी काल गूगलने महत्त्वाची घोषणा केली आहे. सलग दोन वर्षे जे अकाउंटला लॉगिन केले नसेल तर ते जीमेलचे अकाउंट. येत्या डिसेंबरपासून. डिलीट केले जाईल. जुनी अकाऊंट डिलीट करण्याचे काम. करण्यापूर्वी वापरकर्त्याला अनेक मॉर्निंग मेसेजेस पाठवले जातील. त्याने जो ई मेल आयडी ओपन केला आहे त्यावर आणि रिकव्हरी इमेल आयडी दिला असेल त्यावरही. गूगलचे म्हणणे असे आहे की सलग दोन वर्षे न वापरण्यात येणारे अकाउंट धोकादायक ठरू शकतात. ते हॅक झाल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. दोन वर्षे सलग न ओपन केलेले अकाउंट वापरकर्त्याला गरजेचे नाही. असे मानून गूगल ते अकाउंट डिलीट करायला सुरुवात करणार आहे. पहिल्यांदा ज्यांनी अकाऊंट ओपन केले पण परत. कधीच लॉग इन क...

Gmailify करा !

  इ मेल हा आजही कार्यालयीन कामासाठी आणि काही प्रमाणात वैयक्तिक कामासाठी आवश्यक आहे. अनेक कंपन्यांनी मेलवरचा भर कमी करून संवादाची नवीन माध्यमे स्वीकारली असली तरी आजही इमेलचे महत्व कमी झालेले नाही. प्रत्येक कंपनी आपले विशिष्ट डोमेन नेम वापरून ही सेवा वापरते. उदा. *.*@timesgroup.com असे इमेल आयडी असतात. कार्यालयीन कामासाठी असे अंतर्गत इमेल आयडी असले तरी खासगी कामासाठी बऱ्याच वेळा जीमेल / आऊटलूक / हॉटमेल / याहू यांची सेवा वापरली जाते. एका वेळेस अनेक इमेल आयडी तयार केलेले असू शकतात. अशा वेळेस प्रत्येक इमेल आयडी वेगवेगळा ओपन करून पाहणे त्रासाचे ठरते. तुम्ही जीमेल वापरत असाल तर इतर सेवांचे (आऊटलूक / हॉटमेल / याहू ) इमेल आयडी इम्पोर्ट अथवा Gmailify करू शकता.   हे Gmailify   म्हणजे काय ? दुसऱ्या सेवेचा इमेल आयडी इम्पोर्ट करण्यासारखाच हा प्रकार आहे. परंतु इम्पोर्ट पेक्षा वेगळा आहे. समजा माझा *.*@याहू.कॉम हा इमेल आयडी आहे. तो Gmailify  केल्यास याहूच्या आयडीवर दिसणारे सगळे मेल मला जीमेलमध्येही दिसतील. याहू आयडी ओपन करून बघण्याची गरज नाही. मी जीमेलमधूनच याहू आयडी वापरून मेल ...