गूगलने आणला जादूचा खोडरबर
आपण एखाद्या पर्यटनस्थळी आहोत आणि कौटुंबिक /वस्तू / वास्तू यांचे फोटो काढत आहोत, एखादी फोटोफार्म चांगली जमते, पण आयत्या वेळी नको तो माणूस फ्रेममध्ये येतो आणि फोटो बिघडतो असे तुमचे अनेकदा झाले असेल. त्या नको त्या व्यक्तीला फोटोशॉप अथवा तत्सम महागडी सॉफ्टवेअर्स वापरून काढून टाकता येते हे खरे असले तरी प्रत्येकाला ते जमतेच असे नाही. आता गुगलने नको ती व्यक्ती / वस्तू काढून टाकण्यासाठी जादूचा खोडरबर ( Magic Eraser ) दिला आहे. तुम्ही गूगल पिक्सेल फोन वापरत असाल तर ही सुविधा मिळेल, पण फक्त याच फोनमध्ये मिळेल असे नाही. तुम्ही Google One चे सभासद असाल (म्हणजेच जास्तीचे स्टोरेज विकत घेतलेले असेल) तर कोणत्याही अँड्रॉइड अथवा आयफोनवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुगलने नुकतीच याची घोषणा केली आहे. सध्या फोनचा वापर बोलण्यासाठी कमी आणि फोटो काढण्यासाठी जास्त होतो. उत्तमोत्तम कॅमेरा असलेले फोन आज बाजारात उपलब्ध आहेत. बहुतेक सगळे जण त्यांचे फोटो गूगल फोटोज मध्ये सेव्ह करतात. त्या फोटोंमधला अनावश्यक भाग / व्यक्ती या Magic Eraser द्वारे काढून टाकणे शक्य होणार आहे. या Magic Eraser मधला Camouf...