पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेसेंजर अधिक आकर्षक !

  स माजमाध्यमांवर संवाद साधताना end-to-end encrypted chats चे फार महत्व असते. तुम्हाला मेसेज पाठवणारा आणि तुम्ही या शिवाय तो मेसेज कोणीही (म्हणजे फेसबुक, मेसेंजर, whatsapp वगैरे) मध्ये वाचू शकत नाही. म्हणून end-to-end encrypted chats सुविधा सेटिंग मध्ये जाऊन सेट करणे गरजेचे असते. Whatsapp ने end-to-end encrypted chats ची सुविधा आधीच दिली आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक मेसेंजरनेही ती दिली. याच सुविधेत मेसेंजरने आजपासून काही नव्या सोयी दिल्या आहेत. Chat themes: सध्या बॅकग्राऊंडवर चाट करण्यापेक्षा आकर्षक बॅकग्राऊंड असली तर केव्हाही चांगली. म्हणून मेसेंजरने नव्या Chat थिम्स उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र त्या वापरताना चॅट वाचताना डोळ्याला उगाच ताण येईल अशी थीम घेऊ नका. Custom chat emojis and reactions: आता स्वतःची वेगळी प्रतिक्रिया देण्यासाठी खास ईमोजी वापरू शकता. अनेक इमोजीनमधून स्वतःच्या वेगळ्या ईमोजी निवडू शकाल. Group profile photos: खासगी चॅट, कार्यालयीन लोकांबरोबर केलेला चॅट वगैरेसाठी वेगवेगळा ग्रुप प्रोफाइल फोटो ठेवू शकता. Link previews: चॅटमध्ये कोणी एखादी लिंक दिली तर त्यावर...

इंस्टाग्रामवर येणार Quiet Mode आणि अन्य सुविधा !

  मो बाइलवर Whatsapp , फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट वगैरे पाहताना आपला किती वेळ जातो ते कळतच नाही. 'फक्त दहा मिनिटे बघतो' असे ठरवून आपण हे बघायला सुरुवात करतो पण नंतर अर्धा पाऊण तास कसा जातो ते कळतच नाही. या सर्वांकडून सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सने तर आणखी हैराण व्हायला होते. ती नोटिफिकेशन्स Mute करता येतात हे खरे असले तरी आपल्याला कोणी मेसेज पाठवला आहे का हे सतत बघत राहणारे महाभाग असतातच. आता इंस्टाग्रामने यावर 'Quiet Mode ' हा पर्याय काही देशांत उपलब्ध करून दिला आहे. भारतात तो लवकरच उपलब्ध होईल. हा 'Quiet Mode ' ऑन केला की इंस्टाग्रामचे कोणतेही नोटिफिकेशन येणार नाही, तुमच्या प्रोफाइल स्टेटस वर आपोआप ‘In quiet mode’ असे दिसायला लागेल. या काळात तुम्हाला कोणी मेसेज पाठवला (DM) तर 'मी ‘quiet mode’ मध्ये आहे, नंतर उत्तर देईन, अशा आशयाचा मेसेज DM पाठवणाऱ्याला आपोआप पाठवला जाईल. तुमचे काम झाल्यावर हा ‘quiet mode’ काढून टाकू शकता. सध्या ही सुविधा अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये सुरु झाली आहे. भारतासह इतर देशांत ती लवकरच उपलब...

मायक्रोसॉफ्टची नवी 'क्लाऊड स्टोरेज' सेवा लवकरच ...

  मा यक्रोसॉफ्ट येत्या ३० जानेवारीपासून ग्राहकांना १०० जीबी स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. फक्त तुमची दर महिन्याला अंदाजे १६४ रुपये भरण्याची तयारी हवी. म्हणजे वर्षाला साधारणपणे १९६८ रुपये! “Microsoft 365 Basic" असे या योजनेचे नाव आहे. त्यात सहभागी झाल्यावर तुम्हाला १०० जीबी क्लाऊड स्टोरेज मिळेल. सध्या फोटो आणि व्हिडिओ काढण्याचे / शेअर करण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की हे १०० जीबीसुद्धा काहीजणांना कमी वाटतील हा भाग वेगळा.   “Microsoft 365 Basic" योजना लागू झाली की फ्री (५ जीबी) आणि महिना सात डॉलर (अंदाजे ५७५ रुपये) या दोन प्लॅनच्या मध्ये ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल. ही सुविधा घेतल्यास जाहिरातीविना Outlook  web आणि मोबाइल सेवा मिळेल. म्हणजे दोन्ही ठिकाणी जाहिराती दिसणार नाहीत. शिवाय अधिक कडक वेब सुरक्षा मिळेल. त्या अंतर्गत मेलबॉक्समध्ये data encryption मिळेल, संशयास्पद लिंक तपासल्या जातील, मिलमध्ये attachments असतील तर त्या virus  / malaware रोखण्याच्या दृष्टीने आपोआप स्कॅन होतील. ज्या ग्राहकांनी आधीच OneDrive 100GB storage प्लॅन घेतला आहे त्यांना आपोआप नवी...

सॅमसंग S23 ची घोषणा एक फेब्रुवारीला ...

 सॅमसंग S23 आज भारतात विविध कंपन्यांचे फोन उपलब्ध असले तरी सॅमसंग या दक्षिण कोरियन कंपनीचे फोन अजूनही लोकांच्या पसंतीस उतरतात. वन प्लस, आयफोन आणि सॅमसंग या तीन फोनना जास्त मागणी आहे, परंतु कमी किमतीतले कितीतरी चांगले फोन बाजारात मिळतात. या पार्श्वभूमीवर सॅमसंग कंपनीने नव्या S23 या मॉडेलची घोषणा केली आहे. त्यासाठी अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे एक फेब्रुवारीला एक कार्यक्रम होणार आहे. नंतर लवकरच हा फोन ग्राहकांना मिळू लागेल. एक फेब्रुवारीचा कार्यक्रम सॅमसंग च्या अधिकृत यु ट्यूब चॅनेलवर ( https://www.youtube.com/samsung ) तसेच सॅमसंगच्या वेबसाइटवर (https://www.samsung.com/in/) पाहता येईल.

विंडोज अपडेट करा, नाहीतर ...

  तं त्रज्ञान क्षेत्रातली प्रत्येक कंपनी त्यांचे तंत्रज्ञान सतत अपडेट करत असते. ग्राहकांना अधिकाधिक सुविधा आणि सुरक्षा देणे हा त्यामागील उद्देश असतो. या सुविधा मिळवायच्या असतील तर ग्राहकालाही त्यांचे संगणकाचे हार्डवेअर अपडेट ठेवणे गरजेचे असते. संगणकातील वेगवेगळी apps सतत अपडेट होत असतात आणि त्यासाठी संगणकाचे हार्डवेअर सुद्धा सक्षम असावे लागते. सध्या विंडोज ११ आले आहे. ज्यांच्या संगणकाचे हार्डवेअर त्यासाठी सक्षम नाही, त्यांना ते वापरता येत नाही. परंतु मायक्रोसॉफ्ट विंडोज १० वापरणाऱ्यांनाही सुविधा व सुरक्षा देत असल्याने सध्या तरी काळजीचे कारण नाही. विंडोज ७ आणि ८.१ वापरणाऱ्या लोकांना मात्र गुगलने काल एक सूचना दिली हे. सध्या सर्वाधिक वापरला जाणारा Browser म्हणजे गूगल क्रोम. या क्रोमची सध्या Version 108.0.5359.125 (Official Build) (64-bit) ही आवृत्ती चालू आहे. यानंतर १०९ क्रमांकाचे व्हर्जन येईल. पुढील सर्वात मोठे अपडेट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल. ते ११० क्रमांकाचे असेल. विंडोज ७ आणि ८.१ वापरणाऱ्या लोकांना हे ११० व्हर्जन वापरता येणार नाही. त्यांच्यासाठी शेवटचा अपडेट १०९ हाच अस...