पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गूगलचा कोलाज एडिटर वापरलात का ?

  अ लीकडे मोबाइल फोन कोणताही असो, त्याचा वापर संभाषण करण्यापेक्षा समाजमाध्यमे, फोटो काढणे व ते सगळे शेअर करणे यासाठीच जास्त होतो. म्हणूनच बऱ्याच वेळा नवीन फोनच्या जाहिरातीत त्यांचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे हे ठळकपणे दिलेले असते. इतर हार्डवेअर / सॉफ्टवेअर , किंमत वगैरे नंतर. वेगवेगळ्या फोनवर वेगवेगळे फोटो अँप उपलब्ध असते. गूगल फोटो हे त्यातले सर्वाधिक लोकप्रिय. इंग्रजी नववर्षाच्या स्वागतासाठी किंवा त्या आधी येणाऱ्या नाताळसाठी एकत्र जमून फोटोसेशन करणे हे तर जणू आवश्यकच बनले आहे. मग ते फोटो शेअर करणे, तसे करताना फोनमध्ये डुप्लिकेट फोटो बरेच साचणे, मग ते सारे काढून टाकण्यासाठी बराच वेळ खर्च करणे वगैरे सगळे आलेच. परंतु, हे फोटो शेअर करण्यातली गम्मत गूगल फोटो ने आणखी वाढवली आहे. कोलाज एडिटर मध्ये बरीच नवीन designs आणून. फोटो नुसते कॉलेज करण्याची सुविधा आधीपासून होती, पण आता त्यात नवी designs आणल्याने अधिक मजा येणार आहे. हे कसे कराल? गूगल फोटो अँप ओपन करा. जे फोटो एकत्रित करायचे आहेत ते निवडा. खालच्या + चिन्हावर टॅप करा. तुम्हाला अल्बम, Movie , ऍनिमेशन आणि कोलाज असे पर्याय दिसतील. त्...

गूगल क्रोमवर वापरा 'पास की'

 अलीकडे सायबर फ्रॉड वाढले आहेत आणि केवळ 'पासवर्ड चोरणे' या एकाच बाबीपुरते ते मर्यादित राहिले नाहीत हे आपण वेगवेगळ्या अनुभवावरून पाहतो आहोत. आपण घराच्या अथवा कार्यालयातील संगणकावर काम करत असताना आपला पासवर्ड हॅक होईल का अशी सतत भीती वाटत असते. यावर गूगल क्रोमने नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही विंडोज ११ किंवा मॅक ओएस अथवा अँड्रॉइड वापरत असाल तर गूगल क्रोम वापरताना पासवर्ड सुरक्षित ठेवणारी 'पास की' यंत्रणा कार्यान्वित करता येईल. नंतर पासवर्ड टाईप करायचा नसल्याने तो हॅक होण्याची सुतराम शक्यता नाही, असे गूगलचे म्हणणे आहे. तुम्ही अँड्रॉइडवर गुगलचा पासवर्ड मॅनेजर किंवा त्याला campatible असे 1Password किंवा Dashlane यासारखे पासवर्ड मॅनेजर वापरात असाल तर ते पासवर्ड आधी क्रोममध्ये सिन्क करावे लागतील. मग तुमचा संगणक / फोन यावर एक 'पास की' सेव्ह होईल. USB security key सारखे त्याचे स्वरूप असेल. ज्या वेबसाइट्स आणि अँप्लिकेशन्स नी passkey API वापरायला सुरुवात केली असेल त्यावर काही सुरक्षाविषयक माहितीची पूर्तता केल्यावर 'पास की' वापरता येईल. अँपल, गूगल, मायक्रो...

आता Whatsapp चेही अवतार

  स माजमाध्यमांवर स्वतःचा फोटो देण्याऐवजी 'अवतार' (स्वतःच्या चेहेऱ्यामोहऱ्याशी जुळणारे चित्र अथवा अन्य कोणत्याही हावभावातील चित्र असे आपण म्हणू या ) देण्याची सुविधा इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर या तीनही प्लॅटफॉर्मवर होतीच. आजपासून Whatsapp वरही ही सेवा उपलब्ध होत आहे. Whatsapp ने ३६ विविध भावभावना अथवा कृती दर्शविणारे ३डी अवतार वापरकर्त्यांसाठी आणले आहेत. स्वतःचा चेहेरा लपविणे व त्यायोगे सुरक्षितता मिळविणे हा हेतू त्यामुळे साध्य होणार असला तरी सगळ्यांचे एकसारखे 'अवतार' झाले तर माणसे ओळखायची कशी हा प्रश्नच आहे. अशामुळे कोणाचीही फसगत होऊ नये म्हणजे झाले. Whatsapp ने आणलेले अवतार हे स्नॅपचॅटचे बिटमोजी आणि apple चे मेमोजी यांच्यासारखे दिसतात अशी चर्चा आहे. ते वापरल्यावरच कळेल. Whatsapp च्या settings मध्ये जाऊन हे अवतार तयार करता येतील. शिवाय आपण जेथे Profile फोटो वापरतो, तेथेही Use Avatar असा पर्याय दिसेल. लवकरच या अवतारामागची प्रकाशयोजना, शेडींग आणि केशरचनेत वैविध्य जाणारे अवतारही उपलब्ध करून देऊ असे Whatsapp ने म्हटले आहे. मात्र एक लक्षात ठेवा. तुम्ही Whatsapp वर तयार ...