पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उत्तम माणसाचा सन्मान !

इमेज
  This is the story of of a tribal village Dahe which is 100 km from Mumbai. The village never  people used to defecate in open. NGO Keshvshrushti helping them to live life with dignity. I approached the Dawoodi Bohra community to build toilets for the village. Accepting my request, they built 11 toilets to make the village open defecation free. Happy that the present and future generations in Dahe village will hopefully live a healthy and happy life. ज्येष्ठ पोलिस अधिकारी एसीपी अविनाश धर्माधिकारी यांची ही ताजी ट्विटर पोस्ट. हे काम करणे कोणा पोलिस अधिकाऱ्याचे काम आहे का असा प्रश्न सकृतदर्शनी पडू शकेल. परंतु रोजच्या धकाधकीच्या कामाबरोबरच अशी समाजोपयोगी कामे करणे हा अविनाश यांचा स्वभावधर्म आहे हे त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे. त्यांची ओळख झाली ती पु. ल. देशपांडे यांचे पुतणे जयंत देशपांडे यांच्यामुळे. मुंबईत कालिना विभागाचे एसीपी असताना अविनाश धर्माधिकारी याना २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त विलेपार्ले उपनगरात एक कार्यक्रम करायचा होता. त्या निमित्ताने निमंत्रण दे...

Whatsapp Community कशी तयार कराल ?

 समाजमाध्यमांवर संवादाचे प्रमुख साधन असणाऱ्या Whatsapp ने गेल्या आठवड्यात सर्वांसाठी Communities म्हणजेच 'समूह' आणले असल्याची घोषणा केली आणि आता जवळपास सर्वानाच ही सुविधा उपलब्ध झाली आहे. ती कशी वापरायची? आधी Whatsapp उघडा. वर उजव्या बाजूला compose चे चिन्ह असेल त्यावर क्लिक करा. नवीन ग्रुप , नवीन कॉन्टॅक्ट आणि नवीन community असे पर्याय दिसतील. त्यातील नवीन community यावर क्लिक करा. नवीन community चे नाव द्या. ते २४ characters पेक्षा कमीअसले पाहिजे. community कशासाठी तयार करत आहात त्याचे वर्णन लिहा. Profile फोटो अपलोड करा. नंतर green arrow आयकॉन दिसेल त्यावर टॅप करून तुम्ही सध्या ज्या ग्रुपमध्ये आहात ते सगळे किंवा निवडक ग्रुप add करा. सध्याचे ग्रुप घ्यायचे नसतील तर स्वतंत्र नवे ग्रुप तयार करू शकता. ग्रुप add करून झाले की green check mark आयकॉन वर क्लिक करा. एका community मध्ये जास्तीतजास्त ५० ग्रुप समाविष्ट करू शकता. तुम्ही community तयार केल्यावर एक Announcement ग्रुप आपोआप तयार होईल. इथे टाकलेला मेसेज सर्वाना मिळेल. या ग्रुपमध्ये जास्तीतजास्त पाच हजार मेंबर होऊ शकतात. म्हणजेच...

आयफोनवरील फोटो बघा विंडोजवर

 आयफोन, आयपॅड, मॅकवर घेतलेले फोटो विंडोजमध्ये कसे घ्यायचे हा प्रश्न अनेकांना पडलेला होता. आता तुमच्याकडे विंडोज ११ असेल तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटणार आहे. विंडोज ११ च्या फोटो अँपमध्ये सुधारणा करण्यात आली असून आयफोन, आयपॅड, मॅकवर घेतलेले फोटो विंडोज मध्ये सहज दिसणार आहेत. मात्र त्यासाठी वापरकर्त्यांना icloud for  windows  अँप डाउनलोड करून त्याचे लॉगिन करावे लागेल.   विंडोज ११ ने हे Update सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिले असून टप्प्याटप्प्याने ते येत्या १५ दिवसांत सगळ्यांना मिळेल. विंडोज १० मध्ये मात्र ही सुविधा मिळणार नाही. त्यातील फोटो अँप जुन्या version चे आहे. तरी तुम्हाला आयफोनवरचे फोटो / व्हिडिओ गूगल फोटोज मध्ये ट्रान्सफर करता येतात. कसे? आयफोनवर गूगल १ हे अँप डाउनलोड करा. गूगल खात्याचे लॉगिन करा. फोटो/ विडिओ/ कॉन्टॅक्टस Sync करा. झाले काम. आयफोनवर फक्त पाच जीबी डेटा फुकट मिळतो. हा खूपच कमी आहे. असे फोटो / व्हिडिओ ट्रान्सफर करत राहिलात तर हा डेटा पुरवून वापरता येईल.   Apple कंपनीने Apple  Music हे अँप विंडोजवर आणले आहे. पुढील वर्षी Apple  TV सुद्धा येई...

इन्स्टाग्राम मेसेजही होणार गायब

  काही काळापूर्वीच Whatsapp ने Disappearing Messages हा प्रकार आणला. तुमचे मेसेज ठराविक काळानंतर आपोआप Delete होतील अशी सुविधा दिली. अगदी २४ तासांपासून ते ९० दिवसांपर्यंत वेळ निश्चित करण्याची ही सुविधा ग्राहकांना आवडली. कारण वाट्टेल त्या फॉर्वर्डेड मेसेजेसनी सगळ्यांना हैराण केले होते. तुम्ही ते मेसेज पाठवले नाहीत याचा अर्थ तुमचा डेटा त्यात जात नाही असे नाही. कारण आलेल्या मेसेजमधले फोटो, व्हिडिओ डाउनलोड झाले की डेटा गेलाच की. एरवीही शेकडो मेसेज रोज delete करत बसने हा व्यापच असायचा. नंतर Whatsapp ने One Time View ही सोय आणली. ज्याला तुम्ही फोटो अथवा व्हिडिओ पाठवताय त्याने एकदा पाहिल्यावर तो गायब होतो. आता इंस्टाग्रामनेही Vanish Mode आणला आहे. इंस्टाग्राम चॅट हेसुद्धा संवादाचे उत्तम साधन आहे. अनेक जण ते वापरतात. इथेचा हा मोड उपयोगी ठरू शकेल. समाज मी ही पद्धत वापरून मेसेज केले, फोटो पाठवले व दुसऱ्या व्यक्तीने ते पाहिले असल्याचे दिसल्यावर या मोडमधून बाहेर आलो की तो चॅट गायब होईल. मात्र सुरुवातीला एकदाच इंस्टाग्राम मधील मेसेंजर फीचर तुम्हाला update करावे लागेल. एकदा हा मोड स्वीकारालात त...

ट्विटर डेटा असा करा डाऊनलोड

सध्या ट्विटरची चिमणी वादळात सापडली आहे. शेकडो लोकांनी ज्या ट्विटरसाठी काम केले, त्याला नावारूपास आणले त्यांना एका मिनिटात नोकरीवरून काढून टाकले आहे. त्यांची काही चूक नसताना. कोणताही उद्योजक एखादी नवी कंपनी विकत घेतो तेव्हा खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कमी करतो, काही वेळा वेतनात कपात करतो, तो त्याला अधिकारही असतो. पण एलोन मस्क यांनी ज्या प्रकारे संपूर्ण डिपार्टमेंट / विभाग एका क्षणात घरी पाठवले ते अत्यंत धक्कादायक आहे. या सर्वाना लवकरच दुसरी नोकरी मिळेल अशी शक्यता सध्याची परिस्थिती पाहता नाहीच. भविष्यात आणखी काय होईल हे सांगणे कठीण आहे. ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी शाबूत राहिली आहे त्यांच्या डोक्यावरही कायमची चिंता असेल. ते अशा परिस्थितीत कसे काम करू शकतील? असो. मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यावर अनेक लोक ट्विटरवरून कायमचे लॉगऑऊट झाले. ज्या ब्लु टिक मुळे आपल्या ट्विटर खात्याला अधिकृतता येते, त्यासाठीही पैसे मोजावे लागणार हे लक्षात आल्यावर आणखी काही या प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडले असल्याची शक्यता आहे. तुम्हीही ट्विटर सोडण्याचा विचार करताय का ? निर्णय तुमचा आहे, पण सोडणार असाल तर सगळा डेटा ...

आले Whatsapp समुदाय, १०२४ जणांचा ग्रुप आणि ३२ जणांचा व्हिडिओ कॉल !

  भा रतासह जगभरात इंटरनेट आल्यापासून एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी विविध साधने उपलब्ध होत आली आहेत. इमेल हे त्यातील एक. परंतु गेल्या दशकभरात विविध समाजमाध्यमानी वापरकर्त्यांच्या मनावर ताबा मिळवला आणि आपण १५ वर्षांपूर्वी या समाजमाध्यमांशिवाय कसे जगत होतो असा प्रश्न पडला. (खरे म्हणजे आनंदात जगत होतो) . WhatsApp आल्यापासून आणखी चित्र बदलले. आज भारतात जवळपास ५२ कोटी लोक WhatsApp नियमित वापरतात. जगभरात हा आकडा जवळपास दोन अब्ज इतका आहे. (माहितीसाठी – फेसबुक १.३ अब्ज लोक वापरतात) .आपला वापर वाढता राहावा म्हणून WhatsApp सतत सुधारणा करत असते, नवनवीन सोयी ग्राहकांना देत असते. दि. १४ एप्रिल २०२२ रोजी WhatsApp ने नवीन घोषणा केली होती. ही सोय होती Community ची. आज जवळपास सात महिन्यांनंतर ती प्रत्यक्षात येत आहे. WhatsApp ग्रुप चे admin या community म्हणजे समुदाय तयार करू शकतील. सध्या २५६ वापरकर्त्यांचा एक ग्रुप बनू शकतो. नंतर हा आकडा ५१२ करण्यात आला. आज तर हा आकडा १०२४ करण्यात आला. असे अनेक ग्रुप एकत्र केले की समुदाय तयार करता येईल. समुदाय तयार करण्यासाठी नवीन ग्रुप admin तयार करू शकतील अथवा सध्य...