पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आता ट्विट करा schedule

इमेज
  माझा एक माजी सहकारी पहाटे पाचपासून ट्विट करायला सुरुवात करतो, तेव्हा मला थोडे आश्चर्य वाटले होते. इतक्या सकाळी ऑनलाईन होऊन ट्विटर वापरायला सुरुवात करायचे हे कशासाठी, हा प्रश्न पडला होता.  मग लक्षात आले. ट्विटरने ट्विट Schedule करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपल्याला ट्विट करताना तो काही तासानंतर अथवा दिवसानंतर प्रत्यक्ष ट्विट व्हावा, अशी सोय आतापर्यंत नव्हती. दुसरे अँप वापरून हे शक्य होत होते, पण ट्विटरअंतर्गत सोय नव्हती.  काही महिन्यांपूर्वी ट्विटरने वेब अँपवर ती उपलब्ध करून दिली आहे. असे ट्विट Schedule करण्यासाठी काय कराल ? वेबवर ट्विटर ओपन करून ट्विट टाईप करा. नंतर खाली एकदम उजव्या बाजूला असलेल्या कॅलेंडर व छोट्या घड्याळ्याच्या  चिन्हावर क्लिक करून हा ट्विट कधी पाठवायचा आहे त्याचे सेटिंग करा. तो ट्विट त्या दिवशी व त्या वेळेला ट्विट होईल. आणि हे Schedule किती काळपर्यंत उपलब्ध आहे? तब्बल तीन वर्षांचे ! म्हणजे आज तुम्ही २०२४मधील ट्विटसुद्धा Schedule करू शकता. हे फारच झाले. ज्या व्यक्तींना एकदोन दिवसानंतर अथवा आठवड्यानंतर ट्विट Schedule करायचे ...

यात तुमचाही फोन आहे का ?

 अनेक जणांना त्यांचा मोबाईल उत्तम स्थितीत असतानाही नवा मोबाईल घेण्याची हौस असते. आपल्याकडे सगळी गॅजेट्स लेटेस्ट हवीत हा त्यामागील दुराग्रह असतो. नवा मोबाईल घेतला तरी जुना मोबाईल बॅक अप म्हणून जवळ असू दे असा विचार करणारे बरेच जण आहेत. जुन्या मोबाईलच्या आधीच मोबाईल मात्र विकायचा प्रयत्न होतो किंवा कचऱ्यात फेकला जातो.   हा कचरा (म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ई - कचरा) जगभरात प्रचंड वाढत आहे. हा आकडा भयावह आहे. international waste electrical and electronic equipment (WEEE) या संघटनेच्या म्हणण्यानुसार या वर्षी जगभरात जवळपास साडेपाच अब्ज फोन फेकून दिले जातील. या फोनमध्ये तांबे (कॉपर) आणि कोबाल्ट हे धातुरूप रासायनिक मूलद्रव्य असते. एकाच फोनचा विचार केला तर ते अतिशय कमी प्रमाणात मिळेल. साडेपाच अब्ज फोनमध्ये ते किती असेल याचा विचार करा. ते काढून घ्यायला हवे असा वरील संघटनेचा आग्रह आहे. जगात सध्या १६ अब्ज मोबाईल फोन आहेत. युरोपमध्ये एक तृतीयांश वापरकर्ते जुने फोन ठेवून देतात, फेकत नाहीत, असेही ही संघटना म्हणते. अर्थात ई - कचरा म्हणजे फक्त मोबाईल फोन नव्हेत. वॉशिंग मशिन्स, टोस्टर्स, कॉम्...

'रिस्पॉन्सिबल' कामाची दशकपूर्ती

 आज भारतात 5G चा जमाना आला असला तरी याचा अर्थ इंटरनेट वेगवान झाले एवढाच घेता येईल. इंटरनेट अधिक सुरक्षित झाले असा चुकीचा अर्थ कोणी काढू नये. अनेक घरांमध्ये आज सुशिक्षित {?) पालकांकडूनही घरातील मूल एक वर्षाचे होण्याआधीच फोन अथवा आयपॅड अथवा कोणतेही गॅजेट याच्याशी जोडले जाते. मूल जसजसे जोडले जाते तसतसे या गॅजेट्सशी अधिक जवळ जाते. आणि पालकांपासून दुरावते. आणि मग हेच पालक मूल 'नेट addict ' झाले म्हणून त्याला / तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जातात. सगळं दोष मुलांचा. या मुलांना इंटरनेटच्या नादी  लावणारे पालक निर्दोष ! ही परिस्थिती आज निर्माण झालेली नाही. 5G  सोडा, अगदी 2G असतानाच त्याची नांदी झाली होती. हे ओळखून ठाण्याच्या 'अहान  फौंडेशन'ने  ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेची स्थापना केली. आज १६ ऑक्टोबरला ही संस्था दहा वर्षे पूर्ण करत आहे. आणि बाहेरच्या जगाची परिस्थिती अशी आहे की या व अशासारख्या अनेक संस्थांची गरज अधिकाधिक भासत आहे. अत्यावश्यक वाटत आहे. Internet  Addiction (आणि या विषयातले अनेक उपविषय) या विषयाने आज इतके अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे की ‘रिस्...

'रिस्पॉन्सिबल' कामाची दशकपूर्ती

 आज भारतात 5G चा जमाना आला असला तरी याचा अर्थ इंटरनेट वेगवान झाले एवढाच घेता येईल. इंटरनेट अधिक सुरक्षित झाले असा चुकीचा अर्थ कोणी काढू नये. अनेक घरांमध्ये आज सुशिक्षित {?) पालकांकडूनही घरातील मूल एक वर्षाचे होण्याआधीच फोन अथवा आयपॅड अथवा कोणतेही गॅजेट याच्याशी जोडले जाते. मूल जसजसे जोडले जाते तसतसे या गॅजेट्सशी अधिक जवळ जाते. आणि पालकांपासून दुरावते. आणि मग हेच पालक मूल 'नेट addict ' झाले म्हणून त्याला / तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जातात. सगळं दोष मुलांचा. या मुलांना इंटरनेटच्या नादी  लावणारे पालक निर्दोष ! ही परिस्थिती आज निर्माण झालेली नाही. 5G  सोडा, अगदी 2G असतानाच त्याची नांदी झाली होती. हे ओळखून ठाण्याच्या 'अहान  फौंडेशन'ने  ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेची स्थापना केली. आज १६ ऑक्टोबरला ही संस्था दहा वर्षे पूर्ण करत आहे. आणि बाहेरच्या जगाची परिस्थिती अशी आहे की या व अशासारख्या अनेक संस्थांची गरज अधिकाधिक भासत आहे. अत्यावश्यक वाटत आहे. Internet  Addiction (आणि या विषयातले अनेक उपविषय) या विषयाने आज इतके अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे की ‘रिस्...

वापरा Confidential Mode !

 आपण एखाद्याला खासगी किंवा कार्यालयीन कामासाठी अत्यंत महत्वाचा मेल पाठवताना अधिक काळजी घेतो. तरीही ज्याला मेल पाठवायचा त्याचा पासवर्ड आणखी कोणाला माहीत असला तर ? मग काय सुरक्षा राहिली? हे लक्षात आल्याने जीमेलने confidential mode उपलब्ध करून दिला आहे. या मोडमधून मेल पाठवल्यास अधिक सुरक्षा मिळते. कसा पाठवायचा हा मेल? जीमेल ओपन करा. नेहेमीसारखा मेल तयार करा. खाली उजवीकडे घड्याळ व मागे कुलूप असे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करून Turn on confidential mode यावर क्लिक करा. टी सुविधा सुरु होईल. समाज तुम्ही तो मोड आधीच activate केला असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही. तेथे एडिट बटण असेल त्यावर क्लिक करा. तिथे दोन पर्याय दिसतील. "No SMS passcode," आणि "SMS passcode," . यातला दुसरा पर्याय निवडा. सेव्ह करा. आणि मेल पाठवा. जो "SMS passcode," सेट केला आहे तो ज्याला मेल पाठवायचा आहे त्याला SMS करून पाठवा. किंवा फोन करून सांगा. तो कोड वापरल्यावरच त्या व्यक्तीला मेल ओपन करता येईल. तुम्ही "No SMS passcode," हा पर्याय निवडला असेल तर कोणत्याही कोडशिवाय ती व्यक्ती मेल ओपन...

वाट्टेल तिथे फेसबुक लॉगिन करू नका !

 इंटरनेट सर्फिंग करताना अनेकांना फोनवर वेगवेगळी अँप डाउनलोड करण्याची हौस असते. ती नवीन अँप वापरून बघायची, आवडल्यास, उपयुक्त वाटल्यास ठेवायची अथवा काढून टाकायची असा खेळ चालत असतो. परंतु Apple आणि गूगल अँप स्टोअर वरची सगळीच अँप सुरक्षित आहेत असे समजण्याचे कारण नाही. फेसबुकने आजच याबाबत इशारा दिला आहे आणि सावध राहण्याची सूचना केली आहे. चुकीची / फसवी अँप डाउनलोड केल्याने दहा लाखांपेक्षा अधिक लोकांचे फेसबुक लॉगिन / पासवर्ड वगैरे तपशील 'पळविले' गेल्याचे फेसबुकने म्हटले आहे. हे कसे झाले? या लोकांनी गेम्स, फोटो एडिटर व इतर लोकप्रिय श्रेणीतील (भविष्य सांगणारी काही अँपसुद्धा) फसवी अँप्स डाउनलोड केली होती. अशी ४०० पेक्षा अधिक अँप्स अस्तित्वात आहेत. अशा अँपचे Review / रेटिंग्स फसवे असतात. आमचे अँप डाउनलोड केल्यास फुकटात full functionality मिळेल असे आश्वासन दिलेले असते. त्याला भुलून ही अँप्स डाउनलोड केल्यावर, ''आता फेसबुक लॉगिन वापरून अँप वापरायला सुरुवात करा'', असा मेसेज येतो. चांगले अँप मिळते आहे या आनंदात ग्राहक फेसबुक लॉगिन करतात. त्याबरोबर त्या अँपच्या निर्मात्याला तुमच...

युरोपीय देशांत एकच चार्जर, भारतात कधी ?

 तुम्ही कोणताही स्मार्टफोन वापरत असाल तरी त्याची बॅटरी किती काळ चालेल ते तुमच्या वापरावर अवलंबून असते. काही फोनची बॅटरी दिवसभर चालते तर काही बॅटरी संध्याकाळनंतर 'मला परत चार्ज करा' असे म्हणतात. त्यातही काही लोकांना ठराविक काळानंतर आधीच फोन विकून नवा फोन घेण्याची हौस असते. त्यामुळे प्रत्येक फोनचे चार्जर घरात साठत जातात. तुम्ही एकाच प्रकारचे फोन घेत असाल तर फार प्रश्न नाही, पण अँड्रॉइड ऐवजी आयफोन अथवा आयफोन ऐवजी अँड्रॉइड वापरायला सुरुवात कराल तर वेगवेगळे चार्जर जवळ बाळगणे आवश्यक ठरते. एक अँड्रॉइड व दुसरा आयफोन असा प्रकार असेल तर हे अत्यावश्यक बनते. येत्या काही महिन्यांत ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. युरोपीय संसदेने परवा एक ठराव करून २०२४ पासून सर्व फोन निर्मात्यांनी स्टॅंडर्ड चार्जिंग पोर्ट म्हणून USB Type-C प्रकारच वापरावा असा निर्णय घेतला आहे. फोन अँड्रॉइड असेल अथवा आयफोन अथवा आणखी कोणता, चार्जिंग पोर्ट USB Type-C हेच असायला हवे. लोकांची असुविधा टाळणे हे एक कारण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चार्जरमुळे ई कचरा वाढण्यावर निर्बंध येतील हे दुसरे कारण. असे झाल्यावर फोन धारकांना केव...