गूगल स्टेडिया होणार बंद !
गूगल स्टेडिया २०१९ मध्ये सुरु झाले तेव्हा लोकांनी हे 'व्हिडिओ गेम्सचे नेटफ्लिक्स' आहे अशी प्रशंसा केली होती. परंतु गुगलला अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्याने स्टेडिया १८ जानेवारी २०२३ रोजी आपला कायमचा निरोप घेणार आहे. स्टेडियाचे उपाध्यक्ष फिल हॅरिसन यांनी आज तशी घोषणा केली आहे. जगभरात विविध माध्यमांवर व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे स्टेडियाही उत्तम प्रतिसाद मिळेल असे गुगलला वाटणे स्वाभाविक होते. तसे झाले नाही. गूगलचे Chromecast streaming device वापरून वेगवेगळी गॅजेट्स, मोबाईल फोन , वेब ब्राउजर्स यामार्फत लोक स्टेडियावर गेम्स खेळत होते. २०२१ मध्ये आपण स्टेडियासाठी नवीन गेम्स तयार करणे थांबवत असल्याचे गुगलने जाहीर केले होते. तेव्हाच स्टेडियाचे भविष्य फार चांगले नाही, हे लक्षात आले होते. लोकांनी गूगल स्टोअरवरून खरेदी केलेली स्टेडिया उपकरणे, सॉफ्टवेअर, आणि इतर खर्च गूगल परत करणार आहे. अर्थात स्टेडिया बंद होणार असले तरी गेमिंग या विषयातून गूगल बाहेर पडणार नाही. स्टेडियामध्ये वापरलेले सॉफ्टवेअर ते इतर ठिकाणी वापरणार आहेत. कोव्हिड -१९ मुळे बदललेली आर्थिक परिस्थ...